अभियांत्रिकीपाठोपाठ डिप्लोमाही ओस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्यासाठी डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत चालली आहे. नाशिक विभागातील 84 पॉलिटेक्‍निकमध्ये उपलब्ध असलेल्या 28 हजार 299 जागांकरिता डीटीईकडे अवघे 11 हजार 273 अर्ज दाखल झालेले आहेत. त्यामुळे सुमारे 60 टक्‍क्‍यांहून अधिक जागा रिक्‍त राहतील, अशी स्थिती निर्माण झाली.

नाशिक : अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्यासाठी डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत चालली आहे. नाशिक विभागातील 84 पॉलिटेक्‍निकमध्ये उपलब्ध असलेल्या 28 हजार 299 जागांकरिता डीटीईकडे अवघे 11 हजार 273 अर्ज दाखल झालेले आहेत. त्यामुळे सुमारे 60 टक्‍क्‍यांहून अधिक जागा रिक्‍त राहतील, अशी स्थिती निर्माण झाली.

गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी क्षेत्रात करिअरकरिता विद्यार्थ्यांकडून आवड दर्शविली जात असल्याने, पॉलिटेक्‍निकच्या माध्यमातून अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती; परंतु काही वर्षांत परिस्थिती प्रचंड बदलली असून, विद्यार्थ्यांअभावी पॉलिटेक्‍निक बंद पडण्याची वेळ आली.

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत विविध अभ्यासक्रमांप्रमाणे दहावीनंतर डिप्लोमा प्रवेशाची प्रक्रिया राबविली जाते आहे. या अभ्यासक्रमाला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देऊनही अपेक्षेप्रमाणे अर्ज दाखल झालेले नाहीत.

Web Title: no admission for diploma engineering