विधान परिषदेचे दरवाजे दिग्गजांना बंद 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची या वेळी विधान परिषदेत जाण्याची संधी हुकणार असून, संख्याबळ नसल्याने मोठ्या नेत्यांना थेट विधानसभा अथवा लोकसभेची तयारी करावी लागणार आहे.

पुढील महिन्यात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक चार आमदार निवृत्त होत आहेत. मात्र, केवळ एकच आमदार विजयी करता येईल एवढेच संख्याबळ असल्याने या चारही नेत्यांना या वेळी विधान परिषदेचे दरवाजे बंद होणार आहेत. 

विधान परिषदेत आक्रमक व अभ्यासू मांडणी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अमरसिंह पंडित, नरेंद्र पाटील व जयदेव गायकवाड हे नामांकित चेहरे निवृत्त होत आहेत. या चारही आमदारांचे सामाजिक व प्रादेशिक महत्त्व असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला आता हे समीकरण जुळवणे अवघड आहे. सुनील तटकरे यांना रायगड लोकसभा मतदारसंघात आगामी उमेदवार म्हणून तयारी करण्याचे आदेश पक्षाने दिल्याने ते सक्रिय झाले आहेत, तर माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडित व जयदेव गायकवाड यांना सध्या विधानसभा अथवा लोकसभेच्या उमेदवारी सांगण्यात आलेले नाही, त्यामुळे हे तीनही नेते तूर्तास तरी विधान परिषदेत दिसणार नाहीत. 

फौजिया खान यांना पसंती?
राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा व माजी मंत्री फौजिया खान यांना या वेळी विधान परिषदेसाठी पसंती मिळेल, अशी चर्चा आहे. परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ काँग्रेसला दिल्यानंतर पक्षाचे वजन असलेल्या या जिल्ह्याला प्रतिनिधित्व देण्याचा विचार आहे.

Web Title: No Chance veteran leaders to Legislative Council