आंदोलन मागे नाही; दूध उत्पादक समितीचा निर्वाळा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 मे 2018

मुंबई -  दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय व मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत ठोस कृती झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा दूध उत्पादक शेतकरी समितीने दिला आहे. त्यानंतरच राज्य सरकारशी चर्चा करू, अशी भूमिका या संघर्ष समितीने घेतली आहे. 

मुंबई -  दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय व मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत ठोस कृती झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा दूध उत्पादक शेतकरी समितीने दिला आहे. त्यानंतरच राज्य सरकारशी चर्चा करू, अशी भूमिका या संघर्ष समितीने घेतली आहे. 

दुधाला प्रतिलिटर 27 रुपयांचा दर द्यावा, या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी समितीने आंदोलन छेडले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी संघर्ष समितीला चर्चेसाठी बोलावले आहे. शेतकरी संघर्ष समितीने राज्य सरकारच्या भूमिकेचे स्वागत केले असले, तरी दूध दराबाबत ठोस कृती आराखडा दिल्याशिवाय चर्चा करण्यास नकार दिला आहे. 

दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी अत्यंत माफक असून, प्रस्तावाशिवाय चर्चा निष्फळ ठरते, असा अनुभव असल्याचे संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे संघर्ष समितीने सांगितले आहे. त्यामुळे आता राज्य सरकार कोणती भूमिका घेते याकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

संघर्ष समितीने सरकारबरोबर चर्चेच्या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. मात्र दूध प्रश्नावर शेतकऱ्यांची मागणी अत्यंत माफक असल्याने ती मागणी सरकार कशा प्रकारे पूर्ण करणार, याबाबत चर्चेअगोदर सरकारने प्रस्ताव द्यावा, अशी विनंती संघर्ष समितीने केली आहे. सरकारने सन्मान्य प्रस्तव दिल्यास नक्की चर्चा करू, अशी प्रतिक्रिया समितीचे समन्वयक कॉ. अजित नवले यांनी व्यक्त केले आहे. दुधाला सरकारने हमी दिल्याप्रमाणे प्रतिलिटर 27 रुपये दर व दूध व्यवसायात वारंवार निर्माण होणारे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी पर्यायी दूध धोरण या मागण्या संपूर्णपणे मान्य झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नसल्याचे नवले यांनी स्पष्ट केले. 

Web Title: No movement behind milk production committee