राम कदम, छिंदम ही हीन प्रवृत्ती : उद्धव ठाकरे 

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray


मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांच्या बाबत जे अकलेचे तारे तोडले आहेत, ती हीन वृत्ती आहे. अगोदर छिंदम व प्रशांत परिचारक यांनीही अशाच प्रकारची अस्मिता दुखवणारी वक्‍तव्ये केल्याने या सर्व हीन प्रवृत्ती आहेत, अशी संतप्त टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. 

रंगशारदामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी राम कदम यांच्यासह केंद्र सरकारच्या धोरणावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, माता-भगिनींचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. कोणत्याही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही पाहिजे. छिंदम आणि परिचारक यांच्याप्रमाणेच भाजपने राम कदम यांच्यावरही कारवाई करायलाच हवी. 

दरम्यान, गुजरातमध्ये उपोषणाला बसलेल्या हार्दिक पटेलशी संपर्क केल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. हार्दिक पटेलने समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे. त्याच्या उपोषणाचा 12 वा दिवस आहे. त्याने उपोषण सोडावे असे मी त्याला सांगितले. उपोषण कोणा पुढे करायचे? ज्यांना संवेदना आहेत त्याच्या समोर उपोषण करून फायदा आहे. गुजरात आणि समाजाला तुझी गरज आहे. अतिरेकी आणि पाकिस्तानशी बोलण्यापेक्षा देशातील तरुणांशी संवाद करून प्रश्न सोडवा, असे आवाहन त्यांनी भाजपला केले. 

नवीन गोष्टी घडत आहे पोलिस पत्रकार परिषद घेत आहेत. शहरी नक्षलवाद आणि सनातन याबद्दल नुसते आरोप करू नका. खऱ्याचे पुरावे सादर करा. हिंदू दहशतवाद या सरकारच्या काळात बोलले जात असेल तर ते दुर्दैव असल्याचेही ते म्हणाले. 

नोटबंदी फसली याची जवाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी केला. मृत्यूच्या शय्येवर रुपया आहे याची सरकार जबाबदारी घेणार का? गरज पडली तर पुन्हा नोटबंदी लावू हे आरबीआय पुन्हा सांगत आहे. मात्र, जनता हे सहन करणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. 

एका बाजूला "बेटी बचाव बेटा पढाव' असे म्हणायचे, अन दुसरीकडे "बेटी भगाव' असे अर्वाच्च वर्तन करणाऱ्या आमदाराला पाठिशी घालायचे. हा प्रकार म्हणजे "बेटी भगाव'ला भाजपचे समर्थन आहे काय? 
- संजय राऊत, शिवसेना खासदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com