मंत्रालयात अद्याप प्लॅस्टिकबंदी नाही 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 एप्रिल 2018

मुंबई - पर्यावरणाचे संवर्धन आणि पुरासारख्या संभाव्य नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी राज्यात प्लॅस्टिकबंदी करण्यात आली. याची सुरवात मंत्रालयापासून करण्यात आली. मात्र, हे रिसायकलिंग केंद्र अद्याप बंद आहे तर मंत्रालयात रोज राज्याच्या कानाकोपऱ्यातून भेटायला येणाऱ्यांच्या गळ्यात मारले जाणारे प्रवेश पास हे प्लॅस्टिकचेच आहेत. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेणारे मंत्रालय हे अद्याप प्लॅस्टिकमुक्‍त झाले नसल्याचे वास्तव समोर आले आहे. 

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी उद्योगपतींचा विरोध बाजूला सारत शासनाने प्लॅस्टिकबंदीची घोषणा केली. याबाबत जनतेत जागृती व्हावी, यासाठी शासनाने दहा कोटी रुपये मंजूर केले आहेत, तर या निर्णयाची मुहूर्तमेढ मंत्रालयातच रोवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आलेले रिसायकलिंग केंद्र अजूनही सुरू झालेले नाही. मंत्रालयात विविध कामांसाठी, कामाच्या पाठपुराव्यासाठी राज्यातून हजारो जण येत असतात. मंत्रिमंडळाची बैठक असेल तर ही संख्या काही हजारांत जाते. तसेच महत्त्वाच्या बैठकांसाठी क्षेत्रीय पातळीवरील सरकारी अधिकारी मंत्रालयात बैठकीला येत असतात, त्यांनादेखील मंत्रालयात येण्यासाठी प्रवेश ओळखपत्र घ्यावे लागते. हे प्रवेश ओळखपत्र प्लॅस्टिकचे आहे. अभ्यागत मंत्रालयातून बाहेर पडताना हे प्रवेश पास परत दिले जातात. हे पास प्लॅस्टिकचे आहेत. 

Web Title: no plastic ban in Mantralaya environment