चाचणीसाठी ‘प्रिस्क्रिप्शन’ गरजेचे नाही; कोरोनाबाबत ‘आयसीएमआर’ची नवी नियमावली जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

‘आयसीएमआर’ने यापूर्वी केलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार कोरोना चाचणीसाठी सरकारी डॉक्‍टरांची चिठ्ठी असणे अनिवार्य केले होते. त्यामुळे सरकारी दवाखाने तसेच रुग्णालयांच्या बाहेर रुग्णांची गर्दी होत होती. 

मुंबई -एखाद्या व्यक्तीला कोरोना चाचणीसाठी सरकारी डॉक्‍टरांच्या चिठ्ठीची (प्रिस्क्रिप्शनची) आता गरज नाही. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) कोरोना चाचणीबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून त्यात हा बदल सुचवण्यात आला आहे.

‘आयसीएमआर’ने यापूर्वी केलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार कोरोना चाचणीसाठी सरकारी डॉक्‍टरांची चिठ्ठी असणे अनिवार्य केले होते. त्यामुळे सरकारी दवाखाने तसेच रुग्णालयांच्या बाहेर रुग्णांची गर्दी होत होती. शासकीय आरोग्य यंत्रणा तसेच डॉक्‍टरांवरही याचा ताण येत होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

‘आयसीएमआर’ने सरकारी तसेच खासगी मिळून एक हजार ४९ प्रयोगशाळांना कोरोना चाचणीची परवानगी दिली आहे. त्यात ७६१ सरकारी, तर २८८ खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.  राज्याचे प्रयोगशाळा नमुन्यांचे प्रमाण पाच हजार ८४७ एवढे असून देशपातळीवरील हे प्रमाण चार हजार ६१० एवढे आहे. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्य चाचणी मूलभूत अधिकार
अनेक खासगी प्रयोगशाळा चांगले काम करत आहेत. त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करणे गरजेचे आहे, असेही ‘आयसीएमआर’ने म्हटले आहे. आपल्या आरोग्यासाठी आवश्‍यक चाचणी करणे हा रुग्णाचा मूलभूत अधिकार आहे, आपण त्यांना रोखू शकत नाही. रुग्णांनी अधिकाधिक चाचण्या केल्यास त्याच्या आरोग्यासाठी ते महत्त्वाचे ठरणार असून, कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यात मदत मिळणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No prescription required for testing; ICMR announces new rules on corona