नाणार प्रकल्पासंबंधी दबाव नाही..! 

नाणार प्रकल्पासंबंधी दबाव नाही..! 

मुंबई - बहुचर्चित नाणार प्रकल्प रद्द करण्याचा शब्द शिवसेनेला दिलेला असताना नाणार संबंधी कोणताही दबाव नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांना दिली. 

नाणार रद्द करू नका, कोकणातल्या बेरोजगारांच्या पोटावर मारू नका, अशी मागणी घेऊन प्रमोद जठार व आमदार प्रसाद लाड यांनी नाणारवासीयांच्या शिष्टमंडळासोबत आज विधानभवनात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ‘‘राजकीय दबावापोटी नाणारचा बळी देऊ नका. या प्रकल्पामुळे कोकणात रोजगार निर्माती होणार आहे. पर्यावरणाला कोणताही धोका नाही. त्यामुळे नाणार आहे त्याच जागेवर उभा करा. या प्रकल्पाला सर्व कोकणवासीयांची सहमती मिळेल,’’ असा दावा जठार यांनी केला. 

नाणार रद्द करण्याची अट शिवसेनेने युती करताना घातली होती. त्यामुळे या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिली होती. 

‘‘शिवसेना व नारायण राणे यांच्या राजकीय कुरघोडीमुळे ‘नाणार’चा बळी जात असल्याची टीका जठार यांनी केली. ग्रामस्थांना सरकारने मोबदल्याचे पॅकेज जाहीर करावे व ते मान्य नाही झाले, तर प्रकल्पाबाबतची भूमिका घ्यावी. मात्र, राजकीय पक्षाच्या महत्त्वाकांक्षेपोटी कोकणच्या विकासात अामूलाग्र बदल करणारा नाणार रद्द करू नका,’’ असे जठार म्हणाले.

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com