राज्यात दमदार पाऊस; मराठवाडा मात्र कोरडा ठाक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

- मराठवाड्याला प्रतीक्षा दमदार पावसाची 
- आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ 33 टक्के पाऊस 

औरंगाबाद : यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हा अंदाज मराठवाड्याबाबत पुरता खोटा ठरला. ऑगस्टचा पहिला आठवडा संपत आला तरीही मराठवाड्यात काही मंडळे सोडता संपूर्ण भाग कोरडा आहे. आतापर्यंत विभागात आजपर्यंत (रविवार) 369.11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वार्षिक सरासरीच्या केवळ 33 टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. 

मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील काही मंडळे, नांदेड जिल्ह्यातील किनवट, बोधडी, वानोळा, आणि तळणी येथे अतिवृष्टी झाली आहे. यात वानोळा येथे 191 टक्‍के पाऊस झाला आहे. असे असले तरी अद्यापही मराठवाडा कोरडा आहे. अनेक ठिकाणी नुसती भुरभुर सुरू आहे. रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात 0.34 मिलिमीटर पाऊस झाला. जालन्यात 0.25 मिमी, परभणी 5.23 मिमी, हिंगोली 26.82 मिमी, नांदेड 29.97 मिमी, बीड 0.79 मिमी, लातूर 8.10 मिमी, उस्मानाबाद 4.28 मिमी म्हणजे संपूर्ण मराठवाड्यात 9.47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

रविवारी 0.25 ते 29 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातही 22 ते 25 जुलैपर्यंत पाऊस नव्हता. आठवड्याभरापासून काही प्रमाणात पाऊस झाला आहे. बीड जिल्ह्यात 62 मंडळांत एक-दोन मंडळे सोडल्यास सर्व मंडळांस मोठ्या पावसाची गरज आहे. मराठवाड्यात उशिराने पेरणी झाली, पीक उगवले आहे. ते जगविण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. 

जिल्हा------ 1 जून ते 4 ऑगस्टपर्यंतचा पाऊस -------- ---- वार्षिक सरासरीच्या तुलनेत टक्केवारी (स्रोत : विभागीय कार्यालय, औरंगाबाद) 
औरंगाबाद----------321.06 मिमी-------------------39.5 टक्‍के 
जालना------------ 332.38 मिमी----------------35.3 टक्‍के 
परभणी-------------367.70-मिमी----------------22.6 टक्‍के 
हिंगोली-------------459.75 मिमी--------------------24.5 टक्‍के 
नांदेड--------------470.58 मिमी-------------------24.3 टक्‍के 
बीड---------------306.99 मिमी-------------------- 18.0 टक्‍के 
लातूर--------------364.94 मिमी---------------------19.7 टक्‍के 
उस्मानाबाद---------333.52 मिमी---------------------20.01टक्‍के 
विभागाची एकूण सरासरी ---369.11 मिमी--------------33.1 टक्‍के 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no raining in marathwada