तेलतुंबडेंना 26 ऑक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश

Not Arrest Civil Rights Activist Anand Teltumbde Decision by Bombay High Court
Not Arrest Civil Rights Activist Anand Teltumbde Decision by Bombay High Court

मुंबई : कथित नक्षलवादी कनेक्‍शनचा आरोप असलेले प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आनंद तेलतुंबडे यांना 26 ऑक्टोबरपर्यंत अटक करता येणार नाही. तसेच नवलखा यांच्यावरील कारवाईबाबत यापूर्वीच निर्णय देण्यात आला होता. 

जानेवारी महिन्यात झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणात कथित नक्षलवादी कनेक्शनचा संबंध असल्याचा आरोप तेलतुंबडे यांच्यावर ठेवण्यात आला होता. या आरोपातून पुणे पोलिसांनी काही जणांना अटक केली होती. यामध्ये आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे तेलतुंबडे आणि नवलखा यांनी आपल्याविरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी प्रयत्न केले होते. यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर आज (शुक्रवार) सुनावणी झाली.

दरम्यान, या सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्राध्यापक तेलतुंबडे यांना दिलासा देत 26 ऑक्टोबरपर्यंत अटक करु नये, असे आदेश दिले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com