छुपी नव्हे तर भाजपसोबत माझी जाहीर युती : नारायण राणे

छुपी नव्हे तर भाजपसोबत माझी जाहीर युती : नारायण राणे

औरंगाबाद : शिवसेनेच्या विरोधात राज्यात पाच ठिकाणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष उमेदवार मैदानात उतरविणार आहे, अशी घोषणा शुक्रवारी (ता.8) पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. आमच्या पक्षाला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, असे म्हणत शिवसेना व भाजप यांची युती ही नाइलाजास्तव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी आपला पहिला उमेदवार म्हणून औरंगाबादेत सुभाष पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका जाहीर करताना राणे म्हणाले, मी जेव्हा येथे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत यायचो, तेव्हा ते पाटील यांना भेटायचे. त्यांनीच शिवसेनेची बांधणी केली. पक्ष रुजविला. त्यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात मोठे योगदान आहे. तुमच्या पक्षाला मत म्हणजे मोदींना मत, असे समजायचे का? असा प्रश्न विचारला असता, निश्‍चितच. काहीच हरकत नाही, असे त्यांनी नमूद केले.

तसेच युतीसाठी शिवसेनेने भाजपसमोर काही अटी ठेवल्या होत्या? या प्रश्‍नावर त्यांच्या अटींना भाजप मानते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नाणार प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले, की अनंत गिते, विनायक राऊत हे शिवसेनेचेच आहेत. त्यांनीच हा प्रकल्प आणला. त्यांनाच तो रद्द करावा लागला. हे आमचे यश असल्याचा दावाही त्यांनी केला. जिल्हाध्यक्ष म्हणून सुदाम सोनवणे यांच्या नावाचीही घोषणाही यावेळी करण्यात आली. यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित होते. 

खैरेंची कुंडलीच माझ्याकडे 

चंद्रकांत खैरे यांनी नाडी तपासली असता रुग्ण बरा होतो, असे म्हटले होते. मात्र, असे एक तरी उदाहरण आहे का? उलट त्यांनी नाडी तपासल्यावर माणूस आजारी पडायचा, असा टोला यावेळी राणे यांनी लगावला. तसेच त्यांची संपूर्ण कुंडलीच माझ्याकडे आहे. त्यांना आता पाडणारच, असा निर्धारही व्यक्‍त केला. 

नारायण राणे यांच्याशी संवाद साधताना झालेली प्रश्नोत्तरे

शिवसेनेला पाडायचेय का ? 
- होय, चंद्रकांत खैरेंना पाडायचेय. 

भाजपसोबत तुमची छुपी युती समजायची का ? 
- नाही, माझी त्यांच्यासोबत जाहीर युती आहे. 

शिवसेना- भाजपा युतीबद्दल काय वाटते ? 
- शिवसेनेने शिव्या देण्यापलीकडे काय केले, सत्तेसाठी व नाईलाजास्तव केलेली युती आहे. 

भाजपमध्येच राहून का लढत नाहीत? 
- मला तशी गरज नसल्यानेच स्वतंत्र लढतोय. 

तुम्ही भाजपसाठी राज्यात एक चेहरा होतात, मग पुढे काय झाले ? 

- कोणाचा उपयोग कुठे करावा, हे कळायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com