'सीएमओ'वर झळकतेय जुन्या मंत्र्यांचेच नाव!

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जून 2019

- मंत्रिमंडळात देण्यात आली नव्या चेहऱ्यांना संधी.

- काही मंत्र्यांना देण्यात आला डच्चू.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पाच दिवसांपूर्वी पार पडला. यामध्ये राज्यातील नव्या चेहऱ्यांना मंत्रिपद, तर जुन्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात हे मोठे बदल झाले. नवे बदल प्रत्यक्षात झाले असले तरीदेखील मुख्यमंत्री कार्यालयाच्या वेबसाईटवर ही माहिती अपडेट झालेली नाही.

तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात जुन्या मंत्र्यांना डच्चू देण्यात आला तर काही मंत्र्यांचे खातं बदलण्यात आले. यामध्ये शिक्षणमंत्रिपदावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना संधी देण्यात आली. मात्र, सध्या या वेबसाईटवर विनोद तावडे यांचेच नाव झळकत आहे. त्याशिवाय प्रकाश मेहता यांना मंत्रिपदातून डच्चू देण्यात आला असून, त्यांच्याकडील गृहनिर्माण मंत्रालय नवनिर्वाचित मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना संधी देण्यात आली. 

दरम्यान, शिवसेनेच्या दोन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) आठवले गटातील एका नेत्याला मंत्रिपदावर संधी देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not Updated the List of Maharashtras Ministry On website