तंत्रशिक्षण संचालकांना खंडपीठाची नोटीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

जनकल्याण विकास मंडळ संचालित, कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थी प्रवेश संख्या शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने 60 एवढी निश्‍चित केली होती.

औरंगाबाद : बी. फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश संख्या कमी केल्याप्रकरणातील याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुटीतील न्यायाधीश एस. एम. गव्हाणे यांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, संचालक, तंत्रशिक्षण यांच्यासह राज्य सरकारला नोटीस बजावली. 24 मे रोजी याचिकेवर पुढील सुनावणी होईल.

जनकल्याण विकास मंडळ संचालित, कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थी प्रवेश संख्या शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने 60 एवढी निश्‍चित केली होती; मात्र भौतिक व शैक्षणिक सुविधा त्रुटींची पूर्तता करूनही शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी विद्यार्थी प्रवेशसंख्या 60 वरून 45 पर्यंत कमी करण्यात आली. त्या नाराजीने संस्था व महाविद्यालयाने वकील सचिन देशमुख यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याने परिषदेचा निर्णय रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice to Technical Director