नाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

मुंबई : 'अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार फक्त उच्चस्तरीय समितीलाच आहे. सरकारने आज तरी नाणार भूसंपादनाची कोणतीही अधिसूचना रद्द केलेली नाही.' असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) दिले आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पासंबंधी भूसंपादनाची अधिसूचना रद्दच झाली नसल्याचे आता समोर आले आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा हे उद्योगमंत्र्यांचे वैयक्तिक मत आहे. प्रत्यक्षात ही अधिसूचना रद्द करण्यात आलेली नाही. अशी अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार हा मुख्य सचिव समितीला असतो. मात्र, सध्या तरी अधिसूचना रद्द करण्याच कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. नाणार प्रकल्पासंदर्भात राज्य आणि कोकणच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल."

दरम्यान, 'उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भूसंपादनाची मूळ अधिसूचना रद्द केली आहे. त्यामुळे आता नाणार प्रकल्प होणार नाही.' असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नाणारमधील सभेत केला होता. मात्र, अशी कोणतीही अधिसूचना अद्याप सरकारने रद्द केलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

नाणार प्रकल्प लादण्याचे पाप नरेंद्र मोदींचेच : उद्धव ठाकरे
नाणार प्रकल्प शिवसेनेने आणल्याचा अपप्रचार काही लोक करत आहेत. मात्र, सौदी अरेबियाशी करार केल्यानंतर हा प्रकल्प कोणी आणला हे स्पष्ट झाले आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवणाऱ्या व्हीलननेच सौदीचा बोळा कोंबला, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

Web Title: notification for land acquisition of Nagar is not canceled: CM