esakal | मोठी बातमी! साखर कारखान्यांवर आता 25 बेडचे हॉस्पिटल; दोन लाख उसतोड कामगार येणार
sakal

बोलून बातमी शोधा

kumuda-Sugars-Limited - Copy.jpg

कामगारांच्या आरोग्याची कारखान्यांवर जबाबदारी
राज्यात यंदा 190 कारखाने सुरु होतील, असा अंदाज असून आतापर्यंत काही कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. कोरोना काळात कारखान्यांनी त्यांच्याकडील कामगारांची सोय उत्तमप्रकारे करावी, असे पत्र पाठविले आहे. वैद्यकीय सुविधा देणे, लहान मुलांच्या शिक्षणाची सोय करणे, वयस्क व्यक्‍तींना सोबत आणू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
- उत्तम इंदलकर, संचालक, विकास, साखर आयुक्‍तालय

मोठी बातमी! साखर कारखान्यांवर आता 25 बेडचे हॉस्पिटल; दोन लाख उसतोड कामगार येणार

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम 15 ऑक्‍टोबरपासून सुरु होणार आहे. त्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज करावा, असे पत्र साखर आयुक्‍तालयाने कारखान्यांना पाठविले आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वच कारखान्यांनी त्यांच्या परिसरात किमान 25 बेडचे तात्पुरते हॉस्पिटल तयार करुन त्याठिकाणी डॉक्‍टरांसह अन्य कर्मचाऱ्यांची सोय करावी, असेही पत्र आयुक्‍तालयाने कारखान्यांना पाठविले आहे.

कोरोनामुळे यंदा ऊस तोडणी यंत्रांची मागणी वाढली आहे, परंतु ही यंत्रे तयार करणाऱ्या दोन कंपन्या आहेत. त्यामुळे वेळेत पुरवठा करणे अशक्‍य असल्याने यंदा सुमारे दोन लाख ऊस तोडणी कामगार येतील, असा अंदाज आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांची सोय करावी, कामगारांनी येताना 50 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्यांना आणू नये, असेही आयुक्‍तालयाने कारखानदारांना सांगितले आहे. वाहतूकदार व कामगारांशी कारखान्यांनी करार केले आहेत. कोरोनामुळे कारखान्यांनी चारशे ते पाचशे यंत्रांची मागणी नोंदविली आहे. आणखी मागणी केली असतानाही यंत्रे उपलब्ध होत नाहीत. दरम्यान, आतापर्यंत राज्यातील अवघ्या 20 ते 22 कारखान्यांनीच गाळपासाठी अर्ज केले आहेत.

कामगारांच्या आरोग्याची कारखान्यांवर जबाबदारी
राज्यात यंदा 190 कारखाने सुरु होतील, असा अंदाज असून आतापर्यंत काही कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. कोरोना काळात कारखान्यांनी त्यांच्याकडील कामगारांची सोय उत्तमप्रकारे करावी, असे पत्र पाठविले आहे. वैद्यकीय सुविधा देणे, लहान मुलांच्या शिक्षणाची सोय करणे, वयस्क व्यक्‍तींना सोबत आणू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
- उत्तम इंदलकर, संचालक, विकास, साखर आयुक्‍तालय


थकहमी नसल्याने कारखान्यांनी केले नाहीत अर्ज
राज्यातील 37 साखर कारखान्यांनी राज्य शासनाकडे थकहमीसाठी अर्ज केले आहेत. साखर आयुक्‍तालयाच्या माध्यमातून या कारखान्यांचे प्रस्ताव सरकार दरबारी पाठविण्यात आले आहेत. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. तत्पूर्वी, राज्य सहकारी बॅंकेने कारखान्यांना अर्थसहाय करताना ज्या कारखान्यांची आर्थिक स्थिती अडचणीची आहे, त्यांना शासनाची थकहमी बंधनकारक केली आहे. मात्र, अद्याप शासन स्तरावरुन त्यांच्याबाबतीत काहीच निर्णय न झाल्याने या कारखान्यांनी गाळपासाठी अर्जही केलेले नाहीत, अशी स्थिती आहे.


आगामी गाळप हंगामाची स्थिती

  • गाळपासाठी तयार असलेले कारखाने
  • 190
  • ऊस तोडणीसाठी येणारे कामगार
  • 2 लाख
  • ऊस तोडणी यंत्रे
  • 500
  • गाळपासाठी अर्ज करण्याची मुदत
  • 30 सप्टेंबर