आता मंत्री दुष्काळी गावांच्या दौऱ्यावर

BJP
BJP

मुंबई - राज्यातील दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्र्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. सदर पाहणी दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित मंत्र्यांना दिले आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अन्य मंत्री व राज्यमंत्र्यांनी राज्यातील 201 तालुक्‍यांना प्रत्यक्ष भेटी देऊन संभाव्य दुष्काळाची शक्‍यता विचारात घेऊन याबाबतचा आढावा घेण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनेनुसार मंत्री व राज्यमंत्र्यांच्या जिल्हानिहाय भेटींचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या जिल्ह्यात 4 पेक्षा जास्त तालुक्‍यांना भेटी द्यायच्या आहेत अशा जिल्ह्यात अन्य मंत्र्यांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी चर्चा करून तालुके निश्‍चित करण्याचे चंद्रकांत पाटील यांनी सुचविले आहे. संबंधित तालुक्‍यातील किमान पाच गावांना भेटी देऊन तेथील प्रमुख स्थानिक व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करावी, या पाहणी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. 

जिल्हानिहाय जबाबदारी 
औरंगाबाद - दिवाकर रावते आणि डॉ. दीपक सावंत 
जालना - बबनराव लोणीकर आणि सुभाष देसाई 
परभणी - गुलाबराव पाटील आणि बबनराव लोणीकर 
हिंगोली - दिलीप कांबळे 
बीड - पंकजा मुंडे आणि संभाजी पाटील निलंगेकर 
नांदेड - रामदास कदम आणि महादेव जानकर 
लातूर - संभाजी पाटील निलंगेकर आणि अर्जुन खोतकर 
उस्मानाबाद - अर्जुन खोतकर आणि महादेव जानकर 
जळगाव - चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन 
धुळे - दादा भुसे 
नाशिक - गिरीश महाजन आणि राम शिंदे 
अहमदनगर - राम शिंदे आणि पंकजा मुंडे 
अमरावती - प्रवीण पोटे पाटील आणि डॉ. रणजित पाटील 
अकोला - प्रवीण पोटे पाटील आणि डॉ. रणजित पाटील 
वाशीम - संजय राठोड 
यवतमाळ- - मदन येरावार आणि संजय राठोड 
बुलढाणा - मदन येरावार आणि सदाभाऊ खोत 
नागपूर आणि भंडारा - चंद्रशेखर बावनकुळे 
गोंदिया - राजकुमार बडोले 
वर्धा - सुधीर मुनगंटीवार 
चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार, राजकुमार बडोले आणि राजे अंब्रीशराव 
कोल्हापूर - चंद्रकांत पाटील 
सांगली - चंद्रकांत पाटील आणि सुभाष देशमुख 
सातारा - चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे आणि विजय शिवतारे 
सोलापूर - विजय देशमुख आणि सुभाष देशमुख 
पुणे - गिरीश बापट आणि एकनाथ शिंदे, 
पालघर - विष्णू सावरा 
रायगड - रवींद्र चव्हाण 
सिंधुदुर्ग - दीपक केसरकर 
रत्नागिरी - रवींद्र वायकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com