esakal | ....आता प्ले ग्रुप व नर्सरीसाठीही नियमावली

बोलून बातमी शोधा

....आता प्ले ग्रुप व नर्सरीसाठीही नियमावली

राज्यातील सर्वच खासगी शाळांमधील प्ले ग्रुप व नर्सरीच्या प्रवेश शुल्कांवर बंधने आणणार आहोत, त्यासाठी राज्य पातळीवर समिती नेमली आहे. ही समिती तक्रारींवर लगेच कारवाई करेल. 
- वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र

....आता प्ले ग्रुप व नर्सरीसाठीही नियमावली
sakal_logo
By
ज्ञानेश सावंत

मुंबई - प्ले ग्रुप, नर्सरीतील प्रवेशासाठी शाळांत चकरा मारणे, प्रवेश मिळेल की नाही, या धास्तीने जादा शुल्क आणि डोनेशन भरण्याची तयारी दाखवणे, प्रसंगी ते भरणेही... आता हे सगळं थांबणार आहे. कारण, प्ले ग्रुप आणि नर्सरीची प्रवेशप्रक्रिया, त्याची शुल्क आकारणी यासाठीची नियमावली राज्य सरकार करणार आहे. विशेष म्हणजे, सामान्यांसाठी दिलासा देणाऱ्या या नियमांचा श्रीगणेशाही लगेचच होईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्यातील खासगी शाळांच्या प्रवेश शुल्कांवर बंधने आणण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या राज्य विभाग आणि जिल्हा पातळ्यांवरच्या समित्याच प्ले ग्रुप, नर्सरी व्यवस्थापनाच्या कारभारावर नजर ठेवणार आहेत. जादा शुल्क, त्यासाठी प्रवेश नाकारण्याच्या तक्रारी आल्यास व्यवस्थापनाच्या कामकाजावर लाल फुली मारली जाणार आहे.

राज्यात 'इतके' युनिट वीज मोफत मिळण्याची शक्यता; नवे वीज धोरण लवकरच 

खासगी विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या प्रवेश शुल्कावर देखरेख नसल्याने व्यवस्थापन एक-दोन वर्षांनी शुल्कात वाढ करीत आहे. परिणामी, या शाळांचे शुल्क लाखांच्या घरात असल्याने सामान्यांची अडवणूक होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. तेव्हाच, पुण्यासह मुंबई, नागपूरसारख्या शहरांत लहान मुलांसाठीच्या प्ले ग्रुप, नर्सरीचे शुल्कही लाखांत असल्याचा मुद्दा मांडून त्यावर धोरण करण्याची मागणी आमदार नीतेश राणे यांनी शिक्षण खात्याकडे केली होती. त्यानुसार पुढच्या आठ दिवसांत नेमल्या जाणाऱ्या समित्यांत प्ले ग्रुप, नर्सरीचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे शुल्क आकारताना नियंत्रण राहील, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले.

मुस्लीम आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा; शनिवारी अयोध्या दौरा निश्चित

बोगस शिक्षकप्रकरणी २८ जणांवर गुन्हा
पुणे जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये बोगस शिक्षकांची नेमणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात २८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. मात्र, शिक्षकांच्या नेमणुकांदरम्यान कोणताही गैरव्यवहार झाला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात संस्थाचालक, शिक्षणाधिकारी यांनी शिक्षक व तुकड्या मान्यतेचे बनावट आदेश देऊन शिक्षकांच्या नेमणुका केल्या होत्या, हेही गायकवाड यांनी मान्य केले आहे.