जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर

जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे  : नॅशनल टेस्टींग एजन्सीने (एनटीए) घेतलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा-मुख्य (जेईई-मेन) या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. https://jeemain.nic.in/ या अधिकृत संकेत स्थळावर हा निकाल सर्वांना पाहता येईल. 

जेईई मेन्स' परीक्षेचा देणारे विद्यार्थी: 

-  एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेसाठी नऊ लाख 35 हजार 755 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
-  त्यातील आठ लाख 81 हजार 096 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
-  जानेवारी-एप्रिल या दोन्ही परीक्षेसाठी एकूण जवळपास 12 लाख 37 हजार 892 विद्यार्थ्यांनी      नोंदणी केली, त्यातील 11 लाख 47 हजार 125 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामधील सुमारे सहा लाख आठ हजार 440 विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा दिल्या.
-  दोन्ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोन लाख 97 हजार 932 विद्यार्थ्यांना आपली कामगिरी सुधारण्यात यश आले आहे.

यावर्षीचा निकाल ः
- खुल्या प्रवर्गासाठी 89.75 पर्सेंन्टाईल असणारे विद्यार्थी जेईई ऍडव्हान्ससाठी पात्र 
- गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत 'कट ऑफ'मध्ये यंदा वाढ 
- मात्र, 2016 या वर्षातील 'कट ऑफ'शी साम्य
- यंदा जानेवारी आणि एप्रिलमध्ये दोनदा परीक्षा घेण्यात आली होती. 
- दोन्ही परीक्षांची काठिण्य पातळी साधारणपणे समान 
- 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ने अद्याप टॉपर्सची यादी जाहीर केलेली नाही 
- 'जेईई ऍडव्हान्स' परीक्षेला पात्र ठरण्यासाठी जानेवारी आणि एप्रिलमधील परीक्षांपैकी सर्वोत्मक पर्सेन्टाईल ग्राह्य धरणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com