पुणे : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी तीन अंकी सक्रिय रुग्णसंख्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona patient

पुणे : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी तीन अंकी सक्रिय रुग्णसंख्या

पुणे : राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये प्रथमच कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी तीन अंकांपर्यंत मर्यादित राहील. राज्यात रविवारी कोरोनावर उपचार घेत असलेल्या ९२६ रुग्णांची नोंद रविवारी झाली.

राज्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने कमी होत आहे. राज्यात २४ जानेवारी रोजी कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाख ९९ हजार ६०४ होती. हीच संख्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सहा लाख ९९ हजार ८५८ होती. म्हणजे एका दिवशी इतक्या रुग्णांवर राज्यातील विविध ठिकाणी उपचार सुरू होता. राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये प्रथमच कोरोनाबाधीतांची संख्या दोन ते तीन अंकांपर्यंत कमी झाली. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

चीनमध्ये सध्या ओमिक्रॉनचा उद्रेक सुरू असला तरी आपल्या देशात ओमिक्रॉनचा उद्रेक अवघ्या तीन महिन्यांपूर्वी झाला आहे. त्याला प्रतिकार करणारी प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) देशातील नागरिकांच्या शरीरात आहेत. त्यामुळे इतक्या लवकर पुन्हा कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा उद्रेक देशात होण्याची शक्यता कमी आहे, असे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

Web Title: Number Active Patients State Record 926 Patients Undergoing Treatment Corona

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top