esakal | Corona Update : राज्यात नव्या रुग्णांची वाढ सुरुच, बरं होणाऱ्यांचं प्रमाणही वाढलं

बोलून बातमी शोधा

Maharashtra Corona Update
Corona Update : राज्यात नव्या रुग्णांची वाढ सुरुच, बरं होणाऱ्यांचं प्रमाणही वाढलं
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : राज्यात नव्या रुग्णांची वाढ सुरुच असून आज दिवसभरात ६७,१६० नवे रुग्ण आढळून आले. तर तब्बल ६३,८१८ रुग्ण बरे झाले आहेत. एकीकडे मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होत असताना दुसरीकडे मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याचं दिलासादायक चित्र आहे. राज्याच्या आरोग्यविभागानं ही माहिती दिली आहे.

आरोग्यविभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात ६७,१६० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर ६७६ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूंचा आकडा मोठा असल्याने चिंतेचं वातावरण असलं तरी दुसरीकडे ६३,८१८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.02% झाले आहे. राज्यात सध्या ६,९४,४८० अॅक्टिव्ह रुग्ण असून एकूण ६३,९२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: "कोविशिल्डची किंमत माफकच"; लस महाग असल्याच्या चर्चांवर 'सीरम'चं स्पष्टीकरण

दरम्यान, राज्यात आजवर ४२,२८,८३६ रुग्ण आढळून आले आहेत. तर ३४,६८,६१० रुग्ण आजवर बरे झाले आहेत. सध्या ४१,८७,६७५ लोक होम क्वारंटाईन असून २९,२४६ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.