महाराष्ट्राचे पोलिस चार दिवसांपासून दिल्लीत

नूपुर शर्मांचा पत्ताच लागेना; दिल्लीकडून सहकार्य हवे
Maharashtra police in Delhi
Maharashtra police in Delhisakal

नवी दिल्ली : प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल अनुद्गार काढणाऱ्या नूपुर शर्मा दिल्लीकर आहेत. मात्र सध्या त्या दिल्लीतच असूनही नेमके कोठे आहेत याचा शोध घेताना महाराष्ट्र पोलिस चक्रावले आहे. गेले चार दिवस राज्याचे पोलिस नूपुर यांचा शोध घेत आहे या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य केले पाहिजे, असे सूचक वक्तव्य महाराष्ट्र सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.

धमक्या मिळू लागल्यावर दिल्ली पोलिसांनी शर्मा यांना ‘वाय'' दर्जाची सुरक्षा दिली आहे. शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र पडसाद उमटले.तेव्हापासून नूपुर शर्मा दिल्लीतच आहेत. नूपुर शर्मा व त्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने दिलेली सुरक्षा व्यवस्था कडेकोट असल्याने त्या घरातून सहजासहजी बाहेर पडण्याचीही शक्यता नाही.

या स्थितीत त्या महाराष्ट्र पोलिसांनाच कशा आढळत नाहीत, हे दिल्लीच्या यंत्रणेलाच माहिती असलेले गूढ मानले जाते. शर्मा यांनी मध्यंतरी वकिलामार्फत ठाणे पोलिसांना एक ई मेल पाठवून आपली बाजू मांडण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागितली. शर्मा यांना महाराष्ट्र पोलिसांनी आधी समन्स बजावले. त्याला काहीही उत्तर न दिल्याने समन्स त्यांना प्रत्यक्ष देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे पथक दिल्लीत आले आहे. नूपुर शर्मा यांना ताब्यात घेण्यासाठी महाराष्ट्र पोलिस प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्र सदनात पोलिसांचा मुक्काम

शर्मा यांच्यावर देशातील अनेक पोलिस ठाण्यांत तक्रारी दाखल झाल्या आहेत. रझा अकादमीच्या तक्रारीनंतर भिवंडी पोलिसांनीही एक तक्रार दाखल केली आहे. न्यायालयीन आदेशानुसार त्यांना घेऊन जाण्यासाठी वॉरंट घेऊन महाराष्ट्र पोलिसांचे पथक दिल्लीत फिरत आहे पण त्यांना नूपुर शर्मांचा पत्ता लागत नाही. शर्मा यांच्या घराच्या आवारात प्रवेश करण्यास महाराष्ट्र पोलिस पथकाला अडवाअडवी होत आहे काय, याचीही माहिती मिळालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com