ओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय? - प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

औरंगाबाद - सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय? असा सवाल करत ओबीसींना मंडल आयोगाने दिलेले आरक्षण ग्रुप-एक आणि आताचे मराठा समाजाला दिलेले आरक्षण ग्रुप-दोन करून त्यात अंतर्गत बदल होणार नाही, अशी व्यवस्था करा. तरच ते न्यायालयात टिकू शकेल, असे मत भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

तापडिया नाट्यमंदिरात आज झालेल्या ओबीसी हक्क परिषदेत ते बोलत होते. इथल्या व्यवस्थेला ओबीसींच्या हातात सत्ता नको आहे.

विलासरावांनी दिलेली शिष्यवृत्ती त्यांच्या सरकारसोबत गेली. आताही या सरकारने एका वर्षापुरतीच शिष्यवृत्ती दिली आहे. शिक्षणावरचा खर्च तीन टक्‍क्‍यांवरून आठ टक्‍क्‍यांवर नेला असता तर परिस्थिती वेगळी असती, असे मत आंबेडकरांनी मांडले.

ओबीसी मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी पैसा नसेल तर तो राज्यातील देवस्थानांकडून घ्या. देवस्थानांचा पैसा लोकहितासाठी वापरण्यात गैर नाही, असेही आंबेडकर म्हणाले.

Web Title: OBC Maratha Fighting Prakash Ambedkar