आक्षेपार्ह मजकुराची पुस्तके अखेर रद्द 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

मुंबई - संत तुकारामांच्या पत्नी आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर असलेली पुस्तके अखेर शिक्षण विभागातर्फे रद्द करण्यात आली आहेत; तसेच सर्व शिक्षा अभियानातील सर्वच पुस्तकांचे फेरपरीक्षणही केले जाणार आहे. 

मुंबई - संत तुकारामांच्या पत्नी आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर असलेली पुस्तके अखेर शिक्षण विभागातर्फे रद्द करण्यात आली आहेत; तसेच सर्व शिक्षा अभियानातील सर्वच पुस्तकांचे फेरपरीक्षणही केले जाणार आहे. 

सर्व शिक्षा अभियानातील एकभाषिक पूरक वाचन योजनेतील ही पुस्तके होती. "समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकात संभाजीराजांविषयी; तर "संतांचे जीवनप्रसंग' या पुस्तकात संत तुकारामांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला होता. नागपूर येथील लाखे प्रकाशनाच्या "समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकातील छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी छापलेल्या मजकुरावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता. प्रतिभा प्रकाशनच्या गोविंद तळवलकर लिखित "संतांचे जीवनप्रसंग' या पुस्तकात संत तुकारामांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह मजकूर होता. ही दोन्ही पुस्तके तत्काळ रद्द करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांनी केली होती. या मागणीची दखल घेत विद्या प्राधिकरणाचे संचालक सुनील मगर यांनी या पुस्तकांचे वितरण तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले होते. तसेच या दोन्ही पुस्तकांच्या परीक्षणासाठी डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासतज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल नुकताच शालेय शिक्षण विभागाकडे सादर केला. त्यानुसार दोन्ही पुस्तके रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. 

Web Title: Offensive text books finally canceled