Chhagan Bhujbal : सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण; 'इंडिक टेल्स'विरोधात कारवाईची मागणी, भुजबळ म्हणाले...

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal

मुंबईः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखान करुन चुकीचा प्रचार करणाऱ्या इंडिक टेल्स या वेबसाईटविरोधात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी कठोर कावाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट यांच्याविरोधात आज कारवाई न झाल्यास उद्या मुंबई पोलिस आयुक्तांना भेटणार असल्याचं छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं. जोपर्यंत पोलिसांकडून ठोस उत्तर मिळत नाही तोपर्यंत आपण ठिय्या मांडणार असल्याचा इशारा भुजबळांनी दिला आहे.

Chhagan Bhujbal
IIT Mumbai : आयआयटी विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात; मुंबई पोलीसांच्या एसआयटीकडून 483 पानी आरोपपत्र दाखल

छगन भुजबळ म्हणाले की, मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून सावित्रीबाई फुले यांना त्रास दिला गेला. क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणासाठी मोठं काम केलं आहे. विसाव्या शतकात त्यांच्यावर शेण फेकण्यात आलं, दगडं मारण्यात आली. तरीही त्यांनी शिक्षणाचं काम सुरुच ठेवलं. मात्र आज त्यांच्याविषयी आक्षेपार्ह लिहिलं जातं, हे निषेधार्ह आहे.

Chhagan Bhujbal
CM Eknath Shinde : कोस्टल रोडवरील दुसरा बोगदा खणन्याचा अखेरचा टप्पा पूर्ण; 'सागरी किनारा प्रकल्प दिलासा देणारा'

'इतिहासाची पुनर्मांडणी करण्याच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रकार सुरु आहे. अशी समाजविघातक प्रवृत्ती ठेचून काढण्याची गरज आहे. सरकारने इंडिक टेल्स या वेबसाईटवर बंदी आणून लेख लिहिणारावर कारवाई करावी' अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

Chhagan Bhujbal
CM Eknath Shinde : कोस्टल रोडवरील दुसरा बोगदा खणन्याचा अखेरचा टप्पा पूर्ण; 'सागरी किनारा प्रकल्प दिलासा देणारा'

छगन भुजबळ यांचं ट्विट

आक्षेपार्ह लेखनातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल गलिच्छ प्रचार करणाऱ्या 'इंडिक टेल्स' या वेबसाइटविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या संतापजनक प्रकाराचा सर्व थरातून, देशभरातून निषेध होणे गरजेचे आहे. इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट यांच्या विरोधात आज संध्याकाळपर्यंत कारवाई न झाल्यास उद्या मी स्वतः मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन याविरोधात कारवाई करण्याचा आग्रह धरणार आहे आणि जोपर्यंत ठोस उत्तर मिळत नाही तोपर्यंत तिथे ठिय्या मांडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com