मतदानाच्या टक्‍क्‍यासाठी "ऑफर'ची लयलूट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

मुंबई - सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी हॉटेल, रिसॉर्ट आणि टॅक्‍सीसेवा पुरवठादार कंपन्यांनी ऑफर्स जाहीर केल्या आहेत. मतदान करून आलेल्या नागरिकांना त्यांचा लाभ घेता येईल. 

मुंबई - सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी हॉटेल, रिसॉर्ट आणि टॅक्‍सीसेवा पुरवठादार कंपन्यांनी ऑफर्स जाहीर केल्या आहेत. मतदान करून आलेल्या नागरिकांना त्यांचा लाभ घेता येईल. 

मुंबई, ठाणे आणि उल्हासनगर, पुण्यासह राज्यातील दहा महापालिकांची निवडणूक मंगळवारी (ता. 21) होणार आहे. त्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी खासगी कंपन्या आणि व्यावसायिकांनी पुढाकार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारामुळे राजकारणाविषयी सर्वसामान्यांचे मत नकारात्मक बनले आहे, त्याचा परिणाम मतदानावर होतो आणि मतदानाची टक्केवारी घसरते. या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी कंपन्या आणि व्यावसायिकांनी "ऑफर' जाहीर केल्या आहेत. 

अशा आहेत ऑफर ः 
एमटीडीसीची 25 टक्के सूट मतदान केल्याची खूण "एमटीडीसी'च्या रिसॉर्टवर दाखवल्यास मतदारांना आरक्षणावर 25 टक्के सूट मिळणार आहे. त्याचप्रमाणे लोणावळा- खंडाळा परिसरातील हॉटेल व्यावसायिकांनीही 15 ते 20 टक्के सूट जाहीर केली आहे. 

आहारची सवलत 
मुंबईतील "आहार' या हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेचे सात हजार सदस्य आहेत. त्यांनी मतदारांना खास "ऑफर' जाहीर केल्या आहेत. त्यात "फ्री डिश', बिलात सूट, तर काहींनी "स्पेशल फ्री मेन्यू' योजना आखली आहे. ताडदेव येथील व गिरगाव येथील रेस्टॉरन्टच्या मालकांनी मतदारांना बिलात 50 टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे. 

उबेरमध्ये सवलत 
मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोचण्यासाठी उबेर ही टॅक्‍सीसेवा मदत करणार आहेच, शिवाय नवीन ग्राहकांसाठी पहिल्या दोन फेऱ्यांवर 75 रुपये सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत योजना निवडणुकीच्या दिवसापर्यंत असेल.

Web Title: Offers for the percent of the voting