अखेर खातेवाटप जाहीर? वाचा संपूर्ण यादी

सकाळ वृत्तसंस्था
रविवार, 5 जानेवारी 2020

- अखेर बहुप्रतीक्षित खातेवाटप जाहीर करण्यात आलंय.

मुंबई : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या 36 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र अद्याप चार दिवसानंतर आज खातेवाटपाला मुहूर्त लागलेला पाहायला मिळतोय. आज अखेर महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या खातेवाटप जाहीर करण्यात आलंय. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या स्वाक्षरीनंतर केली जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेले काही दिवस कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून नक्की कुणाला कोणतं खातं याबाबत बैठका घेतल्या गेल्यात. खुद्द शरद पवार यांनी आज माध्यमांना खातेवाटप निश्चित झालंय याबाबत माहिती दिली. या आधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खातेवाटतापामुळे महाविकास आघाडीत कोणतीही अनबन नाही असं देखील सांगितलं होतं. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांकडून सर्व ठीकठाक आहे असं सांगण्यात आलं. मात्र तरीदेखील शपथ घेतल्यानंतर खातेवाटपाचा मुहूर्त लांबलेला पाहायला मिळाला. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर तीनही पक्षांमधील काही पक्षांनी नाराजीचा सूरही लावला होता. 

Image result for mantralaya

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप रखडल्यामुळे अनेक महत्त्वाची कामं देखील रखडली आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहा मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यांना एकाच वेळी अनेक खाती सांभाळायला लागत होती. अशात आज झालेलं खातेवाटप अत्यंत महत्त्वाचा आहे. 

कोणत्या मंत्र्याला कोणते खाते :

- मुख्यमंत्री - सामान्य प्रशासन आणि कायदा व सुव्यवस्था

- अजित पवार - वित्त व नियोजन (अर्थमंत्री)

- जयंत पाटील - जलसंपदा

- छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा

- अनिल देशमुख - गृह

- दिलीप वळसे पाटील - उत्पादन शुल्क व कौशल्य विकास

- धनंजय मुंडे - सामाजिक न्याय 

- हसन मुश्रीफ - ग्रामविकास

- बाळासाहेब पाटील - सहकार व पणन

- राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन 

- राजेश टोपे - आरोग्य 

- जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण 

- नवाब मलिक - कामगार, अल्पसंख्याक विकास

- एकनाथ शिंदे- नगर विकास 

- सुभाष देसाई- उद्योग 

- आदित्य ठाकरे-पर्यावरण 

- अनिल परब-परिवहन 

- उदय सामंत -उच्च तंत्र शिक्षण 

- दादा भुसे- कृषी

- बाळासाहेब थोरात - महसूल

- अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम खातं 

- नितीन राऊत - ऊर्जा

- विजय वड्डेटीवार - ओबीसी, खार जमिनी, मदत आणि पुनर्वसन

-. के.सी.पाडवी - आदिवासी विकास

- यशोमती ठाकूर - महिला आणि बालकल्याण

- अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खातं

- सुनील केदार - दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन

- वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण

- अस्लम शेख - वस्त्रोद्योग,मत्स्य व्यवसाय आणि बंदरं

- सतेज पाटील - गृह राज्यमंत्री (शहर)

- विश्वजित कदम - कृषी आणि सहकार (राज्यमंत्री)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: official list of maharashtras mahavikas aaghadis cabinet roles and duties check full list