पावसाळी अधिवेशनासाठी कर्मचाऱ्यांना दिलेली 'ओला' सेवा बंद 

सोमवार, 9 जुलै 2018

आतापर्यंत वापर केलेल्या सेवेचे पैसे भरले नसल्याने ओला कंपनीने ही सेवा बंद केल्याचे सांगण्यात येते. या सेवेची मर्यादा संपली असे संदेश संबधित वापरकर्त्यांना येत असल्याने कर्मचारी व आमदारांचे खासगी सचिव हवालदिल झाले आहेत. 

नागपूर : पावसाळी अधिवेशनासाठी कर्मचाऱ्यांना दिलेली 'ओला' सेवा बंद करण्यात आली आहे. कमिशनर ऑफिसने पैसे भरले नाहीत, म्हणून ही सेवा बंद करण्यात आली आहे.

पावसाळी अधिवेशनात सुरू असलेली अडथळ्यांची स्पर्धा कमी होण्याचे नाव घेत नाही. पावसामुळे विधानभवनापासून ते आमदार निवास व नेत्याच्या बंगल्यांना फटका बसलेला असताना आता कर्मचार्यांना कार्यालयीन कामासाठी ‘ओला ‘ कारची सेवा देण्यात आली होती. मात्र आज सकाळी अचानक ही सेवा बंद पडल्याने कर्मचार्यांची व आमदारांच्या खासगी सचिवांची त्रेधातिरपीट उडाली.

आतापर्यंत वापर केलेल्या सेवेचे पैसे भरले नसल्याने ओला कंपनीने ही सेवा बंद केल्याचे सांगण्यात येते. या सेवेची मर्यादा संपली असे संदेश संबधित वापरकर्त्यांना येत असल्याने कर्मचारी व आमदारांचे खासगी सचिव हवालदिल झाले आहेत. 

Web Title: OLA service for monsoon session in Nagpur