ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 60 वर्षे करा - अजित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 जुलै 2018

नागपूर - राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 वरून 60 वर्षे करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केली. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांबाबत भाजपचे आमदार अमित साटम यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीवरील चर्चेत सहभागी होताना पवार यांनी सरकारच्या उदासीन धोरणावर टीका केली. शेवटी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घ्यावी आणि तोपर्यंत ही लक्षवेधी पुढे ढकलावी, अशी सूचना पुढे आली. त्यानुसार तालिका अध्यक्ष सुभाष साबणे यांनी लक्षवेधी राखून ठेवल्याचे जाहीर केले. तत्पूर्वी, अजित पवार यांनी सरकारवर आपल्या शैलीत हल्ला चढवला.
Web Title: old people age limit 60 years ajit pawar