राज्यात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढतोय; 68 नव्या रुग्णांची भर

राज्यात 68 , मुंबईत 40 नवे रुग्ण
Omicron patients
Omicron patientssakal media

मुंबई : आज राज्यात 68 ओमिक्रॉन संसर्ग (Omicron patients) असणारे रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 34 राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (National institute of virology) आणि 34 रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी रिपोर्ट केले आहेत. त्यापैकी मुंबई 40, पुणे मनपा 14, नागपूर 4, पुणे ग्रामीण आणि पनवेल प्रत्येकी 3,कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा 1 रूग्णांचा समावेश आहे. (Omicron new sixty eight patients found in Maharashtra)

Omicron patients
नवी मुंबईची मेट्रो सुरु करा; एकनाथ शिंदें यांचे आदेश

आजपर्यंत राज्यात एकूण 578 ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.यातील 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी 1 रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. 7 रुग्ण ठाणे आणि 4 रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

राज्यातील एकूण रुग्णांपैकी 259 रुग्णांना त्यांची आरटी-पीसी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.राज्यात आतापर्यंत 2375 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 166 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com