दीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले 

मंगेश शेवाळकर 
सोमवार, 28 मे 2018

हिंगोली  - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे तातडीने निकाली काढण्याचे आदेश अतिरिक्त पोलिस महासंचालक कार्यालयाने दिले आहेत. 

हिंगोली  - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे तातडीने निकाली काढण्याचे आदेश अतिरिक्त पोलिस महासंचालक कार्यालयाने दिले आहेत. 

राज्यात अकोला, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, ठाणे या परिक्षेत्रासोबतच रेल्वे विभाग व पोलिस आयुक्‍त कार्यालये असे विभाग आहेत. या विभागाअंतर्गत असलेल्या पोलिस ठाण्यांमधून विविध प्रकारचे गुन्हे दाखल होतात. यामध्ये तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्यांचा भाग एक ते पाच या गुन्ह्यांमध्ये समावेश होतो. हे गुन्हे गंभीर गुन्हे मानले जातात; मात्र राज्यात तब्बल एक लाख 42 हजार 869 गुन्ह्यांचे तपास रखडले आहेत. यामध्ये तीन महिन्यांपर्यंत प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांची संख्या 67 हजार 960, तीन ते सहा महिन्यांपर्यंत 34 हजार 626, सहा ते बारा महिन्यांपर्यंत 24 हजार 47, तर एक वर्षापेक्षा अधिक काळ तपासाअभावी प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांची संख्या सोळा हजार 236 एवढी आहे. 

प्रलंबित गुन्ह्यांची संख्या (परिक्षेत्रनिहाय) 
कोल्हापूर - 21 हजार 424 
नाशिक - 12 हजार 161 
अमरावती - 8 हजार 727 
ठाणे - 8 हजार 227 
औरंगाबाद - 6 हजार 474 
नांदेड - 6 हजार 440 
नागपूर - 6 हजार 295 
गडचिरोली - 1 हजार 773 
रेल्वे विभाग - 3 हजार 939 

पोलिसांवरील कामाचा ताण 
पोलिसांना गुन्हे दाखल करणे व तपास करणे एवढेच काम राहिलेले नाही. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासोबतच सण- उत्सवांतील बंदोबस्त, निवडणूक कामाचा बंदोबस्त यासह इतर कामेही करावी लागत आहेत. त्यामुळे गुन्हे निकाली काढण्यावर त्याचा परिणाम होत असल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 

Web Title: one and a half million crimes in maharashtra