राज्यातील ६६ तालुक्‍यांमध्ये ‘एक पुस्तक, एक वही’ उपक्रम राबविणार

गजेंद्र बडे
Friday, 17 July 2020

शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा भार हलका करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून राज्यातील ६६ तालुक्‍यांमध्ये ‘एक पुस्तक, एक वही’ उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्‍याची निवड झाली आहे.

पुणे - शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा भार हलका करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून राज्यातील ६६ तालुक्‍यांमध्ये ‘एक पुस्तक, एक वही’ उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्‍याची निवड झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मूळचा पुणे जिल्हा परिषदेचा असलेला हा उपक्रम आता राज्यभर राबविला जाणार आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जिल्ह्यात सन २०१७- १८ या शैक्षणिक वर्षात राज्यात पहिल्यांदा हा उपक्रम राबविला होता.

महाराष्ट्राला यावर्षीही महापुराचा धोका; श्रावणसरी बसरणारच नाहीत

या उपक्रमामुळे इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे एकच पुस्तक आणि सर्व विषयांसाठी एकच वही घेऊन शाळेत जावे लागणार आहे. या एकाच पुस्तकात सर्व विषयांचे प्रत्येकी एक प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे स्वतंत्र पुस्तक शाळेत न्यावे लागणार नाही. शिवाय दर महिन्याला नवे पुस्तक मिळणार आहे.

राज्यात बारावीचा निकाल ९०.६६ टक्के लागला

राज्यात हा अनोखा उपक्रम राबविण्यासाठी मुंबईतील महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने पुढाकार घेतला आहे. शिक्षण परिषदेच्या वतीने समग्र शिक्षण मोहिमेंतर्गत या पुस्तकांचा एकात्मिक संच विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे.

यंदा शिक्षकांच्या बदल्या ऑफलाइन पद्धतीने होणार; राज्य सरकारने दिले आदेश

उपक्रमाचे फायदे

  • दप्तराचे ओझे कमी होणार
  • विद्यार्थ्यांचा दप्तर आवरण्याचा वेळ वाचेल
  • दर महिन्याला नवे पुस्तक. यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद वाढेल
  • वर्षाच्या शेवटी फाटकी पुस्तके वापरावी लागणार नाहीत
  • अभ्यासक्रम शिकविण्यात सर्व शाळांमध्ये समानता राहील
  • मोठमोठी पुस्तके पाहून विद्यार्थ्यांना वाटणारी अभ्यासाची भीती कमी होईल
  • हलकेफुलके पुस्तके पाहून विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यासाठी आत्मविश्वास वाढेल 

राज्यात पहिल्यांदा पुणे जिल्हा परिषदेने हा उपक्रम स्वखर्चाने राबविला होता. हा उपक्रम दप्तराचे ओझे कमी होण्यास उपयुक्त असल्याने, संपूर्ण पुणे जिल्ह्यात राबविण्यास परवानगीची आणि निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सरकारकडे केली होती. मात्र हा उपक्रम केवळ पुणे जिल्ह्यापुरता मर्यादित न ठेवता राज्यभर सुरू झाला आहे, ही आनंदाची बाब आहे.
- रणजित शिवतरे, उपाध्यक्ष व शिक्षण सभापती, जिल्हा परिषद, पुणे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One book one note book project will be implemented in 66 tahsil of the maharashtra state