देशात एक लाख गावे डिजिटल करणार - धोत्रे

देशात एक लाख गावे डिजिटल करणार - धोत्रे

अकोला -  मेळघाटातील हरिसालच्या धर्तीवर देशातील १ लाख २५ हजार गावे डिजिटल झाली आहेत. यापुढे देशातील आणखी एक लाख गावांना डिजिटल करण्याची योजना असल्याची माहिती नवे केंद्रीय मनुष्यबळ, माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

केंद्रीय मंत्रिमंडळात अकोल्यातील भूमिपुत्राला ७२ वर्षांत प्रथमच स्थान मिळाले. राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आज त्यांचे अकोल्यात प्रथम आगमन झाले. त्यानिमित्ताने विविध संघटना, भाजप कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते म्हणाले, की प्रत्येक खात्याने त्यांच्या पहिल्या १०० दिवसांच्या कामकाजाबाबत कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार दळणवळण व माहिती तंत्रज्ञान खाते देशात आणखी एक लाख डिजिटल गावांची उभारणी करणार आहे. केवळ तंत्रज्ञानाची जोड देऊन चालणार नाही, तर त्यासाठी दुर्लक्षित होत असलेल्या अतिदुर्गम व ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करून, येथून पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही धोत्रे यांनी सांगितले.

प्रत्येकाच्या जीवनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न
मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर काहीतरी भव्यदिव्य करून दाखविण्याचे आश्‍वासन देण्यापेक्षा प्रत्येकाच्या जीवनात कसा बदल घडवून आणता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संजय धोत्रे यांनी सांगितले. नितीन गडकरी यांच्याप्रमाणे काम करून दाखविण्याची अपेक्षा राज्याला धोत्रे यांच्याकडून आहे. त्या अपेक्षांवर उतरण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही ते म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com