सव्वालाख तरूणांना मिळणार रोजगार! राज्यात १३ उद्योजकांना मिळाली जागा, गुंतवणार ७८ हजार कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cm eknath shinde and uday samant
सव्वालाख तरूणांना मिळणार रोजगार! राज्यात १३ उद्योजकांना मिळाली जागा, गुंतवणार ७८ हजार कोटी

सव्वालाख तरूणांना मिळणार रोजगार! राज्यात १३ उद्योजकांना मिळाली जागा, गुंतवणार ७८ हजार कोटी

सोलापूर : दावोस दौऱ्यावर गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक येणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता त्यातील १३ उद्योजकांची ७८ हजार ६६ कोटींची गुंतवणूक निश्चित झाली आहे. त्या उद्योजकांना जागा फायनल झाली असून त्यातून ५९ हजार ८९५ जणांना रोजगार मिळणार आहे.

राज्यातील काही उद्योग परराज्यात गेल्यानंतर बेरोजगारांच्या रोजगाराची चिंता व्यक्त करण्यात आली. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यावर गेल्यानंतर महाराष्ट्रात उद्योग यावेत म्हणून जवळपास १९ उद्योजकांशी करार केले होते.

आता त्यापैकी १३ उद्योजकांना सोलापूर, पुणे, औरंगाबाद, कोकण अशा ठिकाणी जागा दिल्या आहेत. सद्य:स्थितीत सात उद्योजगांना जागा वाटप करण्यात आले आहे. त्यांच्याकडून ५४ हजार ७३० कोटींची गुंतवणूक केली जाणार असून त्यांचे काम काही दिवसांत सुरु होणार आहे. तसेच सहा उद्योजकांची जागा निश्चित झाली असून ‘एमआयडीसी’कडून त्यांना जागा देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

त्या उद्योगांमधून साडेपाच हजार तरूणांना रोजगार मिळणार आहे. त्यानंतर पुढील दोन महिन्यांत आणखी सहा उद्योजकांना जागा दिली जाणार असून त्यांनी काही ठिकाणची जागा पाहणी केली आहे. त्यांच्याकडून अंदाजे ६० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्या उद्योगांमधून राज्यातील ४५ हजार ६५० तरूण-तरूणींना रोजगार मिळेल, असा विश्वास ‘एमआयडीसी’ने व्यक्त केला आहे.

गुंतवणूक अन्‌ कार्यवाही

  • उद्योगांसाठी जागा फायनल

  • एकूण गुंतवणूक

  • ५४,७३० कोटी

  • रोजगार निर्मिती

  • ५४,७३०

---------

प्रस्तावित गुंतवणूक

  • जागा निश्चित, पण वाटप नाही

  • एकूण गुंतवणूक

  • २३,३३६ कोटी

  • रोजगार निर्मिती

  • २३,३३६

-----------

जागा पाहणारे उद्योजक

  • एकूण गुंतवणूक

  • ५९,००० कोटी

  • रोजगार निर्मिती

  • ४५,६५०

राज्यात येणार नवे १९ उद्योग

महाराष्ट्रातील जवळपास दोन लाख कोटींची गुंतवणूक असलेले उद्योग गुजराजला गेले. या पार्श्वभूमीवर कोंडीत सापडलेल्या राज्य सरकारसाठी नवे उद्योग राज्यात आणणे आव्हानात्मक होते. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे आता राज्याता एक लाख ३७ लाख कोटींची गुंतवणूक करणारे १९ उद्योग उभारले जाणार आहेत. त्यातून आगामी वर्षभरात राज्यातील एक लाख सहा हजार ५४५ तरूण-तरूणींना रोजगार मिळेल, असा विश्वास एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला आहे.