राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांची पूरग्रस्तांना आर्थिक मदत

राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांची पूरग्रस्तांना आर्थिक मदत

सांगली: सहा जिल्ह्यांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. डोक्यावरचे छप्पर हरवले आहे. पूरग्रस्तांचे खाण्याचे वांदे झाले आहेत. अशा संकट काळात राज्यभरातून पुरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत आप-आपल्या परीने मदत करत आहेत. यातच राष्ट्रवादी आता मदतीसाठी पुढे आली आहे.राष्ट्रवादी पक्षाचे आमदार खासदार यांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.(One-month-salary-of-NCP-MLA-for-helping-flood-victims-information-ajit-pawar-flood-latest-news-akb84)

पवार म्हणाले, कोल्हापूर, सांगली ,सातारा ,रायगड, रत्नागिरी, अमरावती आधि राज्यात पुराने थैमान घातले आहे. दरडी कोसळल्या आहेत. याची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. राज्यात पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात छावण्या अनेक ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत. सध्या 6 जिल्ह्यामध्ये 64 जण बेपत्ता आहेत. सांगलीत 130 गावे बाधित असून कुपवाड, सांगली, मिरज येथील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. रत्नागिरीत 1200 जनांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. सांगलीचा महापूर हा मानवनिर्मित नाही. असे हि त्यांनी सांगितले.

धरण क्षेत्रात कोणत्याही प्रकारची वृक्ष तोड झालेली नाही. कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाणी अडविण्यात आले आहे. सांगलीत पिण्याच्या पाण्याचे टँकर दिले जातील.पाणी पूर्ण ओसरल्यानंतर नुकसानीचा अंदाज बांधता येईल. पूरस्थिती संदर्भात राज्य सरकारचा केंद्र सरकारशी समन्वय आहे. राष्ट्रवादीचे आमदार, खासदार एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना देणार आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातील इतर नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांची पूरग्रस्तांना आर्थिक मदत
'पूरव्यवस्थापन करणारी यंत्रणा अधिक सक्षम करणार'

चिपळूण येथे पूरग्रस्त भागात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पाहणी दरम्यान, एका पूरग्रस्त महिलेने पोटतिडिकीने आक्रोश करत खासदार, आमदारांचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्याचे आवाहन केले त्याला प्रतिसाद देत भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्त निधीस वर्ग करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी जाहीर केला व तसे लेखी पत्र महापौर आणि महापालिका चिटणीस यांना पाठवले आहे.राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. त्यात मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com