लग्नाला जाताना महाडिक कुटुंबांवर काळाचा घाला! समृद्धी महामार्ग ठरला जीवघेणा! | Samruddhi Mahamarg | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

samruddhi mahamarg accident

Samruddhi Mahamarg : लग्नाला जाताना महाडिक कुटुंबांवर काळाचा घाला! समृद्धी महामार्ग ठरला जीवघेणा!

सिंदखेडराजा : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका चालूच आहे. सिंदखेडराजा नजीक टोलनाक्याजवळ २९ एप्रिल रोजी सायंकाळ दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या अपघातात एक महिला ठार झाली, तर एक जण जखमी झाला आहे.

माहीतीनुसार, सिल्वासा, दादरा नगर हवेली येथून एमएच 14 एचजी 0485 क्रमांकाच्या कारने महाडिक कुटुंब नागपूर येथे जात होते. यावेळी जीवन महाडिक वाहन चालवित होते. दरम्यान सिंदखेडराजा शहरानजीकच्या टोलनाक्याजवळ कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटू हा अपघात झाला.

या अपघातात कारमधील नीलम महाडिक गंभीर जखमी झाल्या होत्या. मात्र त्यांचा सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चालक जीवन महाडिक हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे. तसेच कार मधील त्यांच्या समवेत असलेले यश महाडिक, सोहम महाडिक, सौम्या महाडिक हे तिघे सुखरूप आहे.

महाडिक कुटुंब नागपूर येथे एका लग्नासाठी ते जात होते. दरम्यान, सायंकाळी हा अपघात झाला. महिलेचा मृतदेह सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.