कांद्याचे दर घसरल्याने राहुरीत लिलाव बंद

कांद्याचे दर घसरल्याने राहुरीत लिलाव बंद

राहुरी - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर क्विंटलला पाचशे ते सातशे रुपये कमी दिल्याने आज दुपारी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. नंतर संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर नगर-मनमाड महामार्गावर दोन तास ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. चर्चेतून तोडगा निघाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

कांद्याचे लिलाव आज सकाळी सुरू झाले, तेव्हा चांगल्या प्रतीच्या कांद्याला चार ते पाच हजार रुपये क्विंटल भाव अपेक्षित होता. मात्र, काल (सोमवारी) वांबोरी उपबाजारात झालेल्या लिलावांपेक्षा प्रतवारीनुसार पाचशे ते सातशे रुपये कमी भाव निघत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. 

दरम्यान, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख शेतकऱ्यांसमोर आले. शेतकरी व व्यापारी प्रतिनिधींना बाजार समितीच्या कार्यालयात चर्चेला बोलाविले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com