कांदा अनुदानामुळे विरोधकांचा ‘वांदा’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मुंबई - राज्य सरकारने कांदा उत्पादकांना प्रतिक्‍विटंल २०० रुपयांचे अनुदान जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षाने यावर टीका केली आहे. सरकारचे हे अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीने म्हटले आहे. मात्र, अनुदानाची मागणी करताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा समन्वयाचा अभाव दिसला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिकिलो दहा रुपयांचे अनुदान मिळावे अशी मागणी केली आहे, तर विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रतिकिलो पाच रुपयांचे अनुदान द्या अशी मागणी केली आहे.

Web Title: Onion Subsidy State Government