ऑनलाइन सातबाऱ्याची यंत्रणा कोलमडली 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

सोलापूर : ऑनलाइन सात- बारा उताऱ्यांचा सर्व्हर मागील काही दिवसांपासून वारंवार डाऊन होत आहे. त्यामुळे राज्यातील हजारो खरेदी- विक्रीच्या व्यवहारांचा खोळंबा झाला असून दुय्यम निबंधक कार्यालयात मोठी गर्दी होत आहे. तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी असलेला सात-बारा तयार झाल्यानंतर तो दुसऱ्या नव्या क्‍लाऊड या सॉफ्टवेअरमध्ये लोड करण्यात येत असल्याने सर्व्हरची गती वारंवार मंदावत आहे. 

येत्या एक ऑगस्टपासून राज्यातील ऑनलाइन सात- बारा उताऱ्यांवर डिजिटल स्वाक्षरी होईल, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. परंतु, ते नेमके कधीपर्यंत मिळणार आणि तलाठ्यांकडील हेलपाटे कधी थांबणार असे प्रश्‍न खातेदार विचारत आहेत. 

रि-एडिटद्वारे त्रुटींची दुरुस्ती केलेले सात-बारा उतारे "क्‍लाऊड' या नव्या सॉप्टवेअरमध्ये टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ऑनलाइन सात-बारा उताऱ्याचे सर्व्हर डाऊन होत आहे. सोमवारी (ता. 18) बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होतील. 
चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री 

सातबाऱ्याची स्थिती... 
2.5 कोटी 
एकूण संख्या 

40 लाख 
डिजिटल स्वाक्षरीचे उतारे 

2.10 कोटी 
डिजिटल स्वाक्षरीविना उतारे 

21 लाख 
दोषमुक्‍त उतारे 

Web Title: The online 7-12 system collapsed