ऑनलाईन 'पेट' 23 डिसेंबरला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत प्रथमच ऑनलाईन घेण्यात येणारी पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) आणि राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (नेट) या परीक्षा 16 डिसेंबरला होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. विद्यार्थ्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने "पेट' 23 डिसेंबरला घेण्याचे जाहीर केले. या परीक्षेचे अर्ज भरण्यास मंगळवारी (ता. 6) सुरुवात झाली. 

"पेट'चे हॉल तिकीट 15 डिसेंबरपासून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी तारखेतील बदलाची नोंद घ्यावी, अशी सूचना परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी केली आहे. ऑनलाईन प्रवेश परीक्षेचे अर्ज 6 नोव्हेंबरपासून संकेतस्थळावर उपलब्ध असून, प्रवेश शुल्कही ऑनलाईन भरता येईल. या परीक्षेचे अर्ज केवळ ऑनलाईन असतील. विद्यार्थ्यांना मुद्रित प्रत विद्यापीठात जमा करण्याची आवश्‍यकता नाही. परंतु, अर्जाची प्रिंट आऊट पुढील संदर्भासाठी काढून ठेवावी, अशी सूचना करण्यात आली आहे. 

विद्यार्थ्यांनी "पेट'चे अर्ज भरताना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्‍यकता नाही. प्रवेश पात्रता पाहूनच अर्ज भरणे आवश्‍यक आहे. ही परीक्षा चार विद्याशाखांमधील 78 विषयांत घेतली जाणार आहे. या विषयांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

Web Title: Online PET exam on 23rd December