पतसंस्थांसाठी आता ऑनलाइन पोर्टल

Online-Portal
Online-Portal

ठेवीदारांच्या व्यवहारात पारदर्शकता; सहकार खात्याला पतसंस्थांवर नियंत्रण शक्‍य
पुणे - राज्यातील सहकारी पतसंस्था आणि सहकार खाते यांच्यातील समन्वय आणि ऑनलाइन कामकाज करण्यासाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे सहकारी पतसंस्था आर्थिक आकडेवारी ऑनलाइन सहकार खात्याकडे दाखल करु शकतील. या माहितीच्या आधारे सहकार खात्याला पतसंस्थांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल. तसेच, पतसंस्थांच्या ठेवीदार-खातेदारांच्या व्यवहारात पारदर्शकता येणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्व पतसंस्थांना दर तिमाहीला अहवालाद्वारे पतसंस्थेची आर्थिक आकडेवारी सहकार खात्याकडे सादर करावी लागते. परंतु ही माहिती ग्रामीण पातळीवरून सहकार आयुक्त कार्यालयाकडे वेळेत पोचत नाही. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांची आर्थिक आकडेवारी ऑनलाइन दाखल करण्याचे बंधन घातले आहे. या माहितीच्या आधारे आरबीआय प्रत्येक तिमाहीला देशाचे आर्थिक धोरण ठरवते. परंतु सहकार खात्याला पतसंस्थांकडून आर्थिक आकडेवारी उपलब्ध होत नाही. केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालयांमध्ये सर्व कामकाज ऑनलाइन होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पतसंस्थांचे कामकाजही ऑनलाइन व्हावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने सहकार आयुक्‍तांकडे केली होती.

सहकार खात्याचेही कामकाज गतिमान होणार
सहकार खात्यातर्फे जारी केली जाणारी परिपत्रके किंवा सूचना या पोर्टलद्वारे सहकारी पतसंस्थांना देता येतील. या पोर्टलमुळे पतसंस्थांचे भागभांडवल, राखीव निधी, ठेवी, कर्जे, बॅंकेची संख्या, एनपीए बाबतची आकडेवारी पोर्टलद्वारे उपलब्ध होऊ शकेल. हे पोर्टल मोबाईलवरही वापरता येणार आहे. त्यामुळे इंटरनेट, सर्व्हर डाऊन, रेंजबाबत अडचणी येणार नाहीत.

१३ हजार २०६ राज्यातील एकूण सहकारी पतसंस्था
सुमारे सव्वा दोन कोटी ठेवीदार-खातेदार

सहकार आयुक्‍तांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत पतसंस्थांसाठी पोर्टल सुरू करण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील सहकारी पतसंस्थांची अचूक आकडेवारी सहकार खात्याकडे उपलब्ध राहील.  फेडरेशनने ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या पोर्टलचे व्यवस्थापन करुन सहकार खात्याला अचूक माहिती पुरविण्याची हमी घेतली आहे.
- काका कोयटे, अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com