ऑनलाइन शॉपिंगची मुलींना सर्वाधिक ‘नशा’!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

मुंबई - अमली पदार्थ, ऑनलाइन गेम, सोशल मीडियावरील चॅटिंग आदींसह ऑनलाइन शॉपिंगनेही आता तरुण-तरुणींच्या मेंदूचा ताबा घेण्यास सुरवात केली आहे. धक्कादायक म्हणजे अशा शॉपिंगची ‘नशा’ चढलेल्यांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे उघड झाले आहे. राज्य नशाबंदी मंडळाकडे आठवड्याला किमान एक व्यक्ती सल्ला घेण्याकरिता येते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ऑनलाइन शॉपिंगकरिता पैसे मिळवण्यासाठी काही मुले स्वतःच्याच घरात चोरी करीत असल्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. एखादा दिवस शॉपिंग न केल्यास व्यसनाधीन रुग्णासारखी ही मुले वागू शकतात. अनेक वेळा ते आक्रमक; तर कधी एकलकोंडे होतात, असे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदवले आहे. ऑनलाइन शॉपिंगचे व्यसन लागलेली किमान एक व्यक्ती आठवड्याला नशाबंदी मंडळाकडे सल्ला घेण्यासाठी येते. घरातील वस्तू गहाळ होणे, मुला-मुलींच्या मौल्यवान वस्तू हरवणे अशा तक्रारी पालकांच्या असतात. मात्र, संबंधित मुला-मुलींशी बोलल्यानंतर ऑनलाइन शॉपिंगसाठी त्या वस्तू विकल्याची कबुली काही जण देतात, असे नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी सांगितले. 

सेल्फीसाठी ट्रायल रूम 
मॉलमध्ये जाऊन विविध प्रकारचे कपडे ‘ट्राय’ करण्याची सवय लागलेले काही तरुण-तरुणी नशाबंदी मंडळाकडे येतात. खरेदी न करता केवळ ट्रायल रूममध्ये नव्या कपड्यात सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर करण्याचे प्रकारही वाढत आहेत.

Web Title: Online shopping girls