एसटी कर्मचाऱ्यांना हजर होण्यासाठी चार दिवसच। बडतर्फ झालेल्यांना ‘अपिला’ची अट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST
एसटी कर्मचाऱ्यांना हजर होण्यासाठी चार दिवसच। बडतर्फ झालेल्यांना ‘अपिला’ची अट

एसटी कर्मचाऱ्यांना हजर होण्यासाठी चार दिवसच! बडतर्फ झालेल्यांना ‘अपिला’ची अट

सोलापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी अवघे चार दिवसच (२२ एप्रिल) शिल्लक आहेत. चार दिवसांत सोलापूर आगारातील ७९० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. फक्त बडतर्फ कर्मचाऱ्यांना विभाग नियंत्रकांकडे अपिल सादर करण्याचे बंधन असून, त्यात त्यांना बडतर्फीचे कारण द्यावे लागते. त्यावर विभाग नियंत्रक निर्णय घेत असून, सोलापूर आगारातील ३२ बडतर्फ कर्मचाऱ्यांना हजर करून घेण्यात आले आहे.

हेही वाचा: शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश। प्राथमिक शाळा आता ७.१० ते ११ पर्यंतच

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी महामंडळ) राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी लांबलेले कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता संपुष्टात आले आहे. सुरवातीला नियमित वेतन मिळावे, वेतनवाढ मिळावी या मागण्यांसाठी सुरू झालेले हे आंदोलन विलिनीकरणाच्या मागणीवरून लांबले. अहोरात्र प्रवाशांची सेवा करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची मागणी रास्त होती. पण, सध्या विलिनीकरण करणे आर्थिकदृष्ट्या अशक्य असतानाही कर्मचारी त्या मागणीवर ठाम राहिले. तत्पूर्वी, सर्व कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळाली, त्यांच्या वेतनाची हमी राज्य सरकारने घेतली. आंदोलन काळात १०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा विविध कारणास्तव जीव गेला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे शेवटचे आवाहन केले. २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेतली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. त्यानुसार आता सोलापूरसह राज्यभरातील बहुतेक कर्मचारी कामावर परतल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: मशिदीवरील भोंग्याबाबत अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरेंची औकात काय?

जिल्ह्यातील गावोगावी ४९० बसगाड्या
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता संपले असून, न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना २२ एप्रिलपर्यंत सेवेवर हजर राहावे लागणार आहे. अन्यथा, मुदतीनंतर एकाही कर्मचाऱ्यास हजर करून घेतले जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याची नोकरी वाचावी म्हणून त्यांच्याशी संपर्क करून त्यांना हजर करून घेतले जात आहे. सोलापूर आगारातील तीन हजार ८०० कर्मचाऱ्यांपैकी जवळपास साडेतीन हजार कर्मचारी कामावर आल्याची माहिती विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी दिली. सध्या जिल्ह्यातील सर्वच मार्गांवर विशेषत: गावोगावी ४९० बस धावत आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: ''दहावी-बारावी निकालासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक''

मे महिन्यात उत्पन्नवाढीचा प्लॅन
सहा महिन्यांपासून विस्कळित झालेली परिवहन सेवा सुरळीत करण्यासाठी पहिले प्राधान्य दिले जात आहे. चांगले उत्पन्न देणाऱ्या मार्गांवर सध्या बस सोडल्या जात आहेत. प्रवाशांचा विश्वास पुन्हा एकदा लालपरीला संपादित करावा लागणार आहे. पण, आर्थिक अडचणीत सापडलेल्या लालपरीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी उत्पन्नवाढीची ठोस पावले उचलली जाणार आहेत. मे महिन्यात नवीन प्लॅनिंगनुसार उत्पन्नवाढीचे प्रयत्न होतील.

Web Title: Only Four Days For St Staff To Be Present The Condition Of Appeal To Those Who Have Gone To

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top