उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात 'या' महिलांना संधी; पाहा कोण आहेत महिला मंत्री

टीम ई-सकाळ
सोमवार, 30 डिसेंबर 2019

कोणत्याही राज्याचं मंत्रिमंडळ जाहीर झालं की, त्यात किती महिलांना स्थान आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा आज, पहिला विस्तार झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 36 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण, या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. तर, मंत्रिमंडळात केवळ तीनच मंत्र्यांचा समावेश करण्यात आलाय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image

Image

कोण आहेत या मंत्री?
कोणत्याही राज्याचं मंत्रिमंडळ जाहीर झालं की, त्यात किती महिलांना स्थान आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळात सध्या केवळ तीनच महिलांना स्थान दिल्याचं दिसतंय. अर्थात मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय हा ज्या त्या घटक पक्षाचा अधिकार होता. पण, शिवसेनेकडून एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. काँग्रेसने अमरावतीच्या यशोमती ठाकूर तर, मुंबईच्या वर्षा गायकवाड यांना मंत्रिमंडळात संधी दिलेली आहे. तर, राष्ट्रवादीकडून रायगडच्या आणि खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे. वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळात संधी देण्यात आलीय तर, राष्ट्रवादी काँग्रेसने आदिती तटकरे यांना राज्यमंत्रिपदी संधी दिली. आदिती तटकरे पहिल्यांदाच आमदार झाल्या असल्याने राष्ट्रवादीने त्यांना  राज्यमंत्रिपदाची संधी दिली आहे. 

Image

आणखी वाचा - संजय राऊत नाराज, शिवसेनेत नाराजी नाट्य शिगेला

आमदार झाल्या आणि मंत्रिही
राष्ट्रवादी काँग्रेसने, या वेळी आदिती तटकरे यांनी उमेदवारी दिली होती. श्रीवर्धन या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. आदिती यांचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यापूर्वी श्रीवर्धनचे प्रतिनिधित्व करत होते. सध्या ते रायगडचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून आदिती यांना संधी देण्यात आली. त्यांनी निवडणुकीत विजयही मिळवला आणि पहिल्यांदा आमदार होताना, थेट मंत्री होणाऱ्या पहिल्या महिला नेत्या ठरल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only three women in cm uddhav thackeray maharashtra ministry