आदिवासी मुलगा, आता आदिवासी जिल्ह्याचा जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. धुळे जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुक्यातील सामोडे गावात जन्मलेल्या राजेंद्र भारूड यांची आदिवासबहुल नंदरूबार जिल्ह्यात पदोन्नतीपर बदली झाली आहे. आदिवासींचे जीवन जगलेल्या या गरिब कुटुंबीतून IASपर्यंत भरारी घेतलेल्या मुलास आता आदिवासींच्या कल्याणासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. 

नंदुरबार : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. धुळे जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुक्यातील सामोडे गावात जन्मलेल्या राजेंद्र भारूड यांची आदिवासबहुल नंदरूबार जिल्ह्यात पदोन्नतीपर बदली झाली आहे. आदिवासींचे जीवन जगलेल्या या गरिब कुटुंबीतून IASपर्यंत भरारी घेतलेल्या मुलास आता आदिवासींच्या कल्याणासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. 

सन 2012 मध्ये आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेले राजेंद्र भारूड यांचा स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्णत्वास आलं आहे. 'मी एक स्वप्न पाहिलं' या पुस्तकात लहानपणी कलेक्टर बनण्याचं स्वप्न गरीब भिल्ल समाजातील राजेंद्र गारूड यांनी पाहिल्याचं आपण वाचलं असेलच. आता, नंदूरबारच्या जिल्हाधिकारीपदी बढतीपर नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे हे स्वप्न पूर्णत्वास आले आहे.

 पाठीवर बिऱ्हाड घेऊन गोवो-गावी भटकणाऱ्या भिल्ल समाजातील भारूड यांचे कुटुंब सामोड्यात स्थिरावले. त्यामुळे स्वत:च्या कुटुंबासह आजुबाजूला असणाऱ्या आदिवासी समाजाचं जगणं राजेंद्र यांनी जवळून अनुभवलंय. आदिवीसींच्या कुटुंबातच त्यांचं बालपण गेलंय. त्यामुळे आता नंदूरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्याचं प्रशासकीय नेतृत्व करण्याच भाग्य त्यांना त्यांच्या कर्तृत्वान मिळवून दिलंय. नक्कीच, राजेंद्र भारूड यांची नंदूरबारच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती ही नंदूरबारमधील आदिवीसींना ऊर्जा आणि प्रेरणा देणारी ठरेल.

दरम्यान, डॉ. भारुड यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक निर्णय घेतले. प्राथमिक शिक्षकांच्या ड्रेसकोडच्या बाबतीत त्यांनी घेतलेला निर्णय त्यांनाच माघारी घ्यावा लागला होता. त्यानंतर आता त्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेतील संघटनांनी असहकार आंदोलन सुरू केले होते. स्वच्छ भारत अभियानाच्या एका कार्यक्रमावरून त्यांच्याबद्दल वादंग निर्माण झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: oor tribal family boy till IAS of nandurbar, Rajendra bharud will now be the Collector of Nandurbar