'ओपो'चे 42 लाखांचे मोबाईल चोरीला

'ओपो'चे 42 लाखांचे मोबाईल चोरीला

कारंजा (घा) : राष्ट्रीय महामार्ग सहावरून ट्रान्सपोर्टद्वारे ओपो कंपनीचे मोबाईल घेऊन जाणारा कंटेनरमधील मोबाईल चोरीची घटना घडली. या चोरीच्या घटनेचा गुन्हा कोणत्या ठाण्यात दाखल करायचा या प्रश्नात अखेर एक महिन्यानंतर कारंजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नागपूर येथून औरंगाबाद येथे ओपो कंपनीचे मोबाईल 6 फेब्रुवारीला कंटेनर क्र. एम. एच. 12 केपी 9736 घेऊन जात असताना वाटेतच अज्ञात चोरट्याने मागच्या दरवाज्याचा सील व लॉक तोडून 364 मोबाईल किंमत 42 लाख 74 हजार नऊशे चाळीस रुपयांच्या मोबाईलची चोरी करण्यात आली. ही घटना सहा फेब्रुवारीला रात्री नऊच्या सुमारास घडली. तळेगाव (श्या. प ) परिसरात उघडकीस आली.

मोबाईल चोरीला गेल्याची माहिती वाहनचालकाने आपल्या ट्रान्सपोर्ट मालकाला दिली. त्यानंतर उघडकीस आलेल्या ठिकाणापर्यंत जवळपास पाच पोलिस ठाण्याचे हद्द पार केली होती. 

त्यामुळे ही घटना नेमकी कुठे घडली? कोणत्या ठाण्याच्या हद्दीत घडली? या संभ्रमात पोलिस विभागाकडून गुन्हा नोंदविण्यात दिरंगाई केली जात होती. अखेर काही मोबाईल बॉक्स पालोर शिवारात मिळाल्याने ट्रान्सपोर्ट मालक श्रीनिवास मुनिरुतनंम (वय 32 रा म्हाडा कॉलनी नागपूर) यांच्या फिर्यादीवरून कारंजा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

महामार्गावरून अनेक ट्रान्सपोर्टद्वारे साहित्याची ने-आण केली जाते. कारंजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत महामार्ग सहावरील दोन ठिकाणी चढ येत असतात. त्या ठिकाणी वाहनांची गती कमी होत असल्याने याचा परिसरात वाहनातून साहित्याची अनेकदा चोरीच्या घटना घडल्या आहेत. तपासात पोलिसांची डोकेदुखी वाढत असल्याने पोलिस ठाण्यातून हात झटकण्याचा प्रकार केला जात असल्याचे या प्रकरणावरून दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com