विरोधकांचा चहापानावर बहिष्कार  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

मुंबई - राज्य शासनाने दुष्काळी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी ५० हजार रुपये आणि फळबागायतदारांना हेक्‍टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर केल्याशिवाय अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिला. राज्य सरकारच्या निषेधार्थ चहापानावर बहिष्कार टाकल्याची घोषणाही त्यांनी केली. विरोधकाच्या भूमिकेमुळे अधिवेशन गाजण्याची चिन्हे आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील
शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी ५० हजार रुपये द्या
ऑक्टोबरपर्यंत राज्यात २३०० शेतकऱ्यांची आत्महत्या
४० लाख शेतकऱ्यांना १६ हजार कोटीच मिळाले 
राज्यातील जलयुक्त शिवारमधील भ्रष्टाचाराचे पुरावे मांडणार 
स्मारकाच्या मुद्यावरही सरकारला जाब विचारणार 

धनंजय मुंडे
आरक्षण, महागाईच्या बाबतीतही जनतेची फसवणूक
सत्ताधाऱ्यांना निवडणुकीनंतर वनवासात जाण्याची वेळ येणार
पाणी वाढण्याऐवजी दुष्काळ वाढला 
कालावधी तीन आठवड्यांचा करावा

Web Title: Opposition boycott tea