Ajit Pawar : विमानतळावर उतरताच पवारांनी ताफा रुग्णालयात वळवला; औरंगाबाद दौरा चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar in Aurangabad
Ajit Pawar : विमानतळावर उतरताच पवारांनी ताफा रुग्णालयात वळवला; औरंगाबाद दौरा चर्चेत

Ajit Pawar : विमानतळावर उतरताच पवारांनी ताफा रुग्णालयात वळवला; औरंगाबाद दौरा चर्चेत

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कार्यकर्त्याची घेतलेली भेट आता चर्चेचा विषय ठरत आहे.

अजित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सकाळी आठच्या सुमारास ते विमानतळावर आले. यावेळी तिथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचं स्वागत त्यांनी स्विकारलं आणि ताफा थेट रुग्णालयाकडे वळवला.

हेही वाचा: Ajit Pawar News: "उपटसुंभ... त्याला मी" ; अजित पवार भर पत्रकार परिषदेत संतापले

तिथे जाऊन त्यांनी राष्ट्रवादीच्या जखमी कार्यकर्त्याची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. अजित पवार सिग्मा रुग्णालयात गेले होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून राष्ट्रवादी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर ३१ डिसेंबर रोजी हल्ला झाला होता.

प्रकृती चिंताजनक असल्याने तरमळे औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे दौऱ्यात नसतानाही अजित पवारांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांची चौकशी केली.