mumbai
mumbai

विरोधकांचे चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आंदोलन

मुंबई : बिल्डरांचा फायदा करून देण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य प्रशासनाचा 42 कोटींचा महसूल बुडवल्याप्रकरणी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी हा घोटाळा समोर आणला. त्यामुळे या मुद्दयावर राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. 

पुण्यातील दोन भूखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय घेऊन 342 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला. पुण्याच्या हवेली तालुक्यातील एका निर्णयातून राज्य सरकारचे ४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले. तर पुण्यातीलच बालेवाडी येथील दुसऱ्या प्रकरणात महसूल मंत्र्यांच्या आशीर्वादामुळे मैदानाच्या आरक्षित जागेवर ३०० कोटींची इमारत उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. जयंत पाटील यांनी हा मुद्दा अर्थसंकल्पातील अनुदानाच्या चर्चेदरम्यान उपस्थितही केला होता. शिवाय याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा मागणी देखील केली. 

भ्रष्टाचाराविरोधात फडणवीस सरकारने सत्ता मिळवली. मात्र, भाजपचे १६ मंत्रीच भ्रष्टाचार करायला लागले तर राज्याचा कारभार चुकीच्या सरकारच्या हातात आहे. त्यामुळे अशा घोटाळेबाज सरकारविरोधात आज राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com