कांदा महागलाय; जाणून घ्या काय आहेत किचनमध्ये ऑप्शन्स...

टीम ईसकाळ
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

गृहिणी आणि हॉटेलवाले कांद्याला पर्याय शोधतात.. हॉटेलमध्ये कांद्याऐवजी दुसरा एखादा पदार्थ दिसला की समजावे कांदा महाग झाला...

गेल्या एक महिन्यापासून जेवणातला एक अविभाज्य घटक असलेला कांदा आपल्या सगळ्यांनाच रडवतोय. तो आपल्या ताटातून, पदार्थातून गायब झालाय. त्यामुळे कांद्याच्या किंमती कमी होण्याची नाही, तर ताटात कांदा कधी दिसेल याची अनेकजण वाट बघत आहेत. कांदा 50 रूपये किलो असला तरी तो पूर्णतः बंद करू नाही शकत... तो वापरण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, पण वापरणे बंद होऊ शकत नाही. कांद्याने भाव वाढवला असला, तरी त्याला भाव देणं आपण कमी करू शकत नाही... 

काही वेळी कांद्याला पर्याय नसतो... पण कांदा तर लागतोच.. अशावेळी गृहिणी आणि हॉटेलवाले कांद्याला पर्याय शोधतात.. हॉटेलमध्ये कांद्याऐवजी दुसरा एखादा पदार्थ दिसला की समजावे कांदा महाग झाला... यावेळी कांदा पन्नास रूपयांपर्यंत गेल्यावर मग कांद्याला पर्याय शोधण्यास सुरवात झाली. 

कोबी 
कांद्याला पर्याय म्हणून बऱ्याचदा कोबीचा वापर केला जातो. कांद्याच्या त्यातल्या त्यात जवळपास जाणारा म्हणून कोबी घालून पदार्थ केले जातात. मग कांदा भजीऐवजी, कोबी भजी, कोशिंबीरीत कांद्याचा वापर, कोरड्या पदार्थांमध्ये कोबीचा कांद्यासारखा वापर केला जातो. 

kobi

काकडी
कांद्याची चव काकडी देऊ शकत नाही, पण पर्याय म्हणून कांद्याऐवजी काकडीचा अनेकदा वापर केला जातो. सँडविचमध्ये, पावभाजीसोबत, कोशिंबीरीत कांद्याऐवजी काकडी घालू शकतो.

काकडी

ढोबळी मिरची
मसाले भातात, पुलावमध्ये, बिर्याणीमध्ये कांद्याऐवजी ढोबळी मिरचीचा वापर केला जातो. ढोबळी मिरची बारीक चिरून ती कोणत्याही प्रकारच्या भातात घालू शकतो.  

ढोबळी मिरची

टोमॅटो
टोमॅटोचा वापर आपण कांद्याऐवजी अनेक पदार्थांत करू शकतो. कोशिंबीरीत, भेळमध्ये, मसाले भातात, सँडविचमध्ये आपण कांद्याऐवजी टोमॅटोचा वापर सर्सास करू शकतो.  

टोमॅटो

ओलं खोबरं 
अनेकदा भाजीच्या वाटणासाठी कांद्याऐवजी खोबऱ्याचा वापर केला जातो. ओलं खोबरं व आलं-लसूण वापरून भाजीचा मसाला तयार करू शकतो. मग त्यात कांदा नसला तरी चालतो.    

 ओलं खोबरं 

बटाटा
आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की, कांदाभजी बरोबरच बटाटा भजीही लोकप्रिय आहेत. तसेच कांदे पोह्याऐवजी बटाटा घालूनही पोहे केले जातात. बटाटा पोहे ही अनेकांची आवडती डिश आहे.

बटाटा

मूळा, गाजर
मसाले भातात किंवा कोणत्याही प्रकारच्या फ्राईड राईसमध्ये कांद्याऐवजी मूळा व गाजराचा उपयोग केला जातो. तसेच आमटीत कांद्याऐवजी मूळा घातला जातो.

मूळा गाजर

कितीही पर्याय शोधले तरी कांद्याची चव कोणताही इतर पर्याय देऊ शकत नाही... त्यामुळे कांदा जपून वापरा किंवा कांद्याचे भाव कमी होण्याची वाट बघा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: options for onion in kitchen