दहावीच्या अभ्यासक्रमात अवयवदानाचा धडा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

मुंबई - अवयवदानासंदर्भात जनजागृती व्हावी, यासाठी राज्य सरकारसह विविध संस्थांकडून जनजागृती करण्यात येत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनाही त्याचे महत्त्व समजावे, यासाठी राज्य शिक्षण मंडळाने दहावी इयत्तेच्या विज्ञान विषयाच्या पुस्तकात अवयवदान, अवयव प्रत्यारोपण आणि देहदानाची माहिती देणाऱ्या धड्याचा समावेश केला आहे. 

अवयवदानाबाबत समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. अवयवदानाबाबत राज्य सरकार जनजागृती मोहीम राबवत असली, तरी त्यात लोकसहभाग वाढणेही गरजेचे आहे. अवयवदान म्हणजे नेमके काय, अवयवदान कधी-कोणाला करता येते, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना शालेय जीवनात मिळावी, या हेतूने दहावीच्या अभ्यासक्रमात अवयवदान या विषयाचा समावेश करण्यात आल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. 

दरम्यान, दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमात शब्दसंपत्तीचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्व-अध्ययन, चिकित्सक वृत्ती, निरीक्षण, निर्णयक्षमता, जबाबदार नागरिकत्वाचे भान, उद्योग-व्यवसायाशी निगडित शिक्षणावरही भर देण्यात आला आहे. 

धड्यात या माहितीचा समावेश... 
- अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय, कोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण शक्‍य असेल 
- अवयव प्रत्यारोपणासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात 
- लोकांचा जीव वाचवण्यासाठी अवयवदान का महत्त्वाचे आहे 
- देहदान म्हणजे काय, दान केलेल्या मृतदेहाचा संशोधनासाठी कसा वापर केला जातो 

Web Title: organ donation Lessons in Class X syllabus