... तर, आमचेही कार्यकर्ते मैदानात - महादेव जानकर

our activist are in the field - Mahadev Jankar
our activist are in the field - Mahadev Jankar

नाशिक : दुधाला दरवाढ दिली असून दूध संघांनी त्याप्रमाणे उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले. त्यानंतरही आंदोलन होणार असेल, तर आमचेही कार्यकर्ते मैदानात उतरतील, असा सूचक इशारा देतानाच दूध उत्पादकांच्या वाहनांना पोलिस संरक्षण दिले जाणार आहे, असे पशुसंवर्धन-दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज येथे सांगितले. तसेच मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसात 10 लाख लिटर दुधाचा साठा करण्यात आलेला असल्याने मुंबईला दुधाची कमतरता भासणार नाही, असाही निर्वाळा त्यांनी दिला. 

आंदोलकांनी कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती श्री. जानकर यांनी दिली. खासगी कार्यक्रमासाठी जानकर हे नाशिकमध्ये आले असताना सरकारी विश्रामगृहात त्यांनी 'सकाळ'शी संवाद साधला. ते म्हणाले, की दुधाला 5 रुपयांची दरवाढ देण्यात आली असून यात 3 रुपयांची दरवाढ येत्या 20 जुलैपासून दिली जाईल. दुधावरील जी.एस.टी. रद्द केल्यानंतर 2 रुपयांची आणखी भर पडेल. त्यानुसार राज्यातील दूध संघांना नोटिसीद्वारे कळविले गेले असून त्यांनी दूध उत्पादकांना दरवाढ द्यायची आहे. त्यानंतरही जे दूधसंघ दरवाढ देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 

शेतकऱ्यांच्या मुलांना नासाडी शोभत नाही 

खासदार राजू शेट्टी यांच्याकडून आंदोलनाचा पुनर्उच्चार केल्याबद्दल विचारले असता जानकर म्हणाले, की आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करावे. पण त्यापूर्वी आपणही शेतकऱ्यांची मुले आहोत, दूध अथवा भाजीपाल्याची नासाडी करणे शोभत नाही याचा विचार करावा. शिवाय आंदोलन करताना ते हिंसक होणार नाही, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. जर कायदा हाती घेण्याचा प्रयत्न केला, तर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे दूध उत्पादकांनी आंदोलनाला न घाबरता दूध पुरवठा करावा. 

गोकुळ'वर कारवाई 

गोकुळ दूध संघाने उद्या (ता.16) पासूनच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यासंदर्भात श्री. जानकर यांनी माहिती घेतो असे सांगितले. शिवाय 'गोकुळ'ने आंदोलनास पाठिंबा दिलाच असेल, तर तात्काळ कारवाई केली जाईल आणि प्रशासक नेमला जाईल, असेही जानकर म्हणाले. 

भाजप सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी काहीही झाले नव्हते. ते आता करण्यात आले आहे. यापूर्वी सरकारच्या शेतकऱ्यांच्या योजना या बढ्या ठगांसाठीच्या होत्या. भाजप सरकारचा सामान्य शेतकरी हाच केंद्रबिंदू आहे.
 
- महादेव जानकर (पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com